Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 December 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ डिसेंबर
२०१९ सकाळी ७.१० मि.
****
** अटल भूजल योजनेचा शुभारंभ; कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याचं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेतकऱ्यांना आवाहन
** मराठवाड्यात वसंतदादा साखर संस्थेची
शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार - मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे
** नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात
राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे
आणि
** मराठवाड्यात तीन विविध अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू
****
शेतीत कमी पाण्यात येणारी पिकं घेण्याची तसंच
ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाद्वारे ऊसाची शेती करण्याची आवश्यकता पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी व्यक्त केली आहे.
अटल भूजल योजनेचा काल नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ झाला,
त्यावेळी ते बोलत होते. सर्व गावांनी पाण्याचा
ताळेबंद तयार करावा, असं आवाहन करतानाच, जी ग्रामपंचायत पाण्याचं योग्य नियोजन करेल, त्या ग्रामपंचायतीला
प्रोत्साहनपर वाढीव निधी दिला जाईल, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
या कार्यक्रमात, जलजीवन मिशनसाठीचे दिशानिर्देशही पंतप्रधानांनी
जारी केले. लद्दाख मधलं लेह आणि हिमाचल प्रदेशातल्या मनालीला
जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याचं अटल बिहारी वाजपेयी बोगदा असं नामकरण काल करण्यात आलं.
आठ किलोमीटर आठशे मीटर लांबीच्या या बोगद्यामुळे मनाली आणि लेहमधलं
अंतर शेहेचाळीस किलोमीटरनं कमी होणार आहे.
****
वसंतदादा साखर संस्थेची शाखा सुरू करण्यासाठी मराठवाड्यात जागा उपलब्ध
करून देणार असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
सांगितलं आहे. ते काल पुण्यात या संस्थेची त्रेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा
आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. याबाबतचा निर्णय तातडीनं घेणार
असल्याचंही त्यांनी सांगितलं. माजी केंद्रीय मंत्री तसंच संस्थेचे अध्यक्ष खासदार
शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांचं दोन लाख
रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा
अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांबाबत सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
यावेळी लातूर जिल्ह्यातल्या
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते आर्थिक व्यवस्थापनाचा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
नागरिकत्व सुधारणा
कायद्याच्या समर्थनात कालही राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. औरंगाबाद इथं राष्ट्रीय
सुरक्षा मंचच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चात विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे,
भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, यांच्यासह अनेक
लोकप्रतिनिधी सहभागी झाले. हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही, मात्र, गैरसमजातून
काही लोक या कायद्याला विरोध करत असल्याचं हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं. ते
म्हणाले..
१९५५ चा कायदा आहे. ज्याच्यामध्ये जे निर्वाचित येतात त्यांना इथ अकरा वर्ष राहील्यानंतर नागरीकत्व मिळतं या कलमाच्या ऐवजी सहा वर्ष जरी राहीला तरी त्याला नागरिकत्व द्या. ऐवढाचं बदल आहे बाकी काहीबदल नाही.
नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनाच्या घोषणा लिहिलेले फलक हाती घेऊन, मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले. पाकिस्तानातून आलेल्या काही जणांनी यावेळी या कायद्यामुळे आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळणार असल्याचं सांगत, सरकारचे आभार मानले.
अमरितलाल नकानी हम पाकिस्तान सिंध से आये हुए है हमको १५–२० साल हुए है हो गई हमारी nationality बच्चों की हो रहती है मोदी सरकारने जो काम किया है उससे हम बहुत खुश है हमारे बाकी लोगों की है उन सबको भी मिल जाएगी
बाल्मिक रसानी हम पाकिस्तान से आये हुए है हमे २८ साल हुए है यहाँ आके हमने काफी मेहनात किया सरकार की तरफ से हमको काफी इधर support मिला है और नागरिक्ता मिली है काफी परेशानी से निजाद मिला हमको
****
हिंगोली इथं काल
या कायद्याच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चाच्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले
आहेत. पोलिसांची परवानगी
नसताना तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला असताना हा मोर्चा काढण्यात
आला होता.
अहमदनगर इथं अखिल
भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं संदेश फेरी काढण्यात आली.
गोंदिया इथंही विविध सामाजिक संस्था तर यवतमाळ इथं, राष्ट्रीय विचारमंचने मोर्चा काढला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
मराठवाड्यात काल
झालेल्या तीन विविध अपघातांमध्ये
१३ जणांचा मृत्यू झाला.
औरंगाबाद- जालना मार्गावर शेकटा गावाजवळ काल सकाळी
मोटारगाडी आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू
झाला, तर कारमधल्या एकाचाही मृत्यू झाला. पेट्रोल पंपावर जाण्यासाठी भरधाव कार विरुद्ध दिशेनं वळली असता ताबा सुटल्याचं
ती समोरुन येणाऱ्या रिक्षावर आदळल्यानं हा अपघात झाला.
बीड जिल्ह्यातल्या
गंगामासला इथं काल पहाटे ट्रॅव्हल्स आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात तीन जणांचा
मृत्यू झाला. परभणीहून पुण्याकडे
जाणारी ट्रॅव्हल्स चालकाचा ताबा सुटल्यानं समोरुन येणाऱ्या कारवर
आदळल्यानं हा अपघात झाला.
औरंगाबाद सोलापूर
महामार्गावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वडगाव पाटीनजिक भरधाव कंटेनरनं बैलगाडीला धडक
दिल्यानं झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. कळंब तालुक्यातल्या
वडगाव इथलं शेटे कुटुंब वेळ अमावस्या साजरी करुन बैलगाडीमधून घरी परतत असताना काल संध्याकाळी सात वाजता हा अपघात झाला.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त काल उस्मानाबाद इथं लोकसेवा समितीच्या वतीनं
लोकसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्यांना गेल्या दहा वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात
येतो. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे
वार्ताहर..
समाजाच्या
सहकार्यामुळं अन्नदान दानाचं
काम सातत्यानं चालू असल्याची भावना राजकुमार खिंवसरा, तर सामाजिक कामांसाठी वेळ देण्याची गरज रघुवीर ओक
यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली समाजाच्या सेवेचे काम पेटत्या पंत्यामुळेच सामजिक
कार्य अंधकार दूर होऊन प्रकाशमान वेत करण्याच काम समाधान मिलिंद पाटील यांनी व्यक्त
केलं
औरंगाबादचे मोफत
अन्नदान करणारे राजकुमार खिंवसरा, सेवानिवृत्तीनंतर समाज सेवा करणारे रघुवीर आणि सुशील ओक, तसंच उस्मानाबाद शहरात रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत सेवा देणाऱ्या अन्नपूर्णा
समुहाला लोकसेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
कर्नाटकलगतच्या लातूर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात मार्गशीर्ष
अमावस्या वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते. काल हा सण सर्वत्र
पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला. याबाबत अधिक माहिती देत आहेत,
आमचे लातूरचे वार्ताहर,
खरीप पेरणीनंतर
येणारी सातवी अमोशा वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते रब्बी चे पीक बहरलेली असते या दिवशी शेतकरी आप –आपल्या
शेतात पांडवांची पूजा करून वन भोजनाचा आनंद घेऊन करतात
****
भारतीय वाङमयाचा
क्रमिक अभ्यासक्रमात समावेश होणं आवश्यक असल्याचं मत प्राध्यापक डॉ. नंदकुमार नाईक यांनी व्यक्त केलं आहे.
ते काल औरंगाबाद इथं प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेच्या,
ज्येष्ठांच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात बोलत
होते. मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी या संमेलनाचं उद्घाटन केलं. साहित्यिक
श्रीकांत उमरीकर यांच्या उपस्थितीत आजच्या काळात कुटुंबाच्या दोन पिढीतील अंतर
: एक चिंतेचा विषय, यावर परिसंवाद झाला.
****
परभणी इथं काल साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य : समकालीन परिप्रेक्ष्य या विषयावरच्या
राज्यस्तरीय चर्चासत्राचं उद्घाटन प्रसिद्ध साहित्यिक इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते
झालं. अण्णाभाऊ साठे हे वैश्विक विचारांचे वारसदार होते,
त्यामुळेच त्यांचं साहित्य सगळ्यांना अपलसं वाटतं, असं भालेराव यावेळी म्हणाले.
****
पश्चिम महाराष्ट्र
आणि विदर्भाच्या धर्तीवर मराठवाड्यात राष्ट्रीय दुग्ध आणि अमूल सारखे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं
कंधारचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी सांगितलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
माळेगाव इथं खंडोबा यात्रेनिमित्त काल पशु, श्वान, अश्व आणि कुक्कुट प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. पशुपालाकंच्या पशुधनांना योग्य भाव मिळाला पाहिजे, असं
ते म्हणाले.
****
या वर्षातलं अखेरचं
सूर्यग्रहण आज होत आहे. सकाळी
आठ वाजून सहा मिनिटांपासून ग्रहणाला सुरुवात होईल, नऊ वाजून सव्वीस
मिनिटांनी ग्रहणाची कंकणाकृती स्थिती सुमारे दीड मिनीट पाहता येईल.
****
औरंगाबादसह राज्यातल्या काही
भागात काल अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रबीच्या पिकांवर विपरीत परिणाम होण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.
****
No comments:
Post a Comment