Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 29 December 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर
२०१९ दुपारी १.०० वा.
****
देशाला
तरुण पिढीकडून अनेक अपेक्षा आहेत. या तरुणांनीच देशाला नवीन उंचीवर न्यायचं आहे, असं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा साठावा भाग आज प्रसारित झाला.
दोन दिवसांत
२०२० हे नवीन वर्ष सुरू होणार असून, आपण २१ व्या शतकाच्या तिसऱ्या दशकामध्ये प्रवेश
करणार असल्याचं ते म्हणाले. २१ व्या शतकातली ही सोशल मीडियाची, प्रतिभावान पिढी, देशाच्या
विकासाला गती देण्यात सक्रिय भूमिका बजावेल, असंही पंतप्रधान म्हणाले. एखादी व्यवस्था
योग्य रीतीनं काम करत नसेल, तर आजचे युवक अस्वस्थ होतात आणि धैर्यानं व्यवस्थेला जाब
देखील विचारतात, हे आपल्याला चांगलं लक्षण वाटत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
येत्या
१२ जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती युवा दिन म्हणून साजरी केली जाणार आहे.
या दशकातल्या प्रत्येक तरुणानं आपल्या जबाबदारीवर चिंतन केलं पाहिजे, आणि या दशकासाठी
एखादा संकल्प देखील केला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले. कन्याकुमारी मध्ये ज्या दगडावर
बसून स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती, तिथे जे विवेकानंद यांचं शिळा स्मारक
आहे, त्याला ५० वर्ष पूर्ण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
२०२२ मध्ये
स्वातंत्र्याची ७५ वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, कमीतकमी या दोन-तीन
वर्षांत आपण स्थानिक, आपल्या देशवासीयांच्या हातांनी बनलेली उत्पादनं खरेदी करण्याचं
आवाहन केलं. स्थानिक उत्पादनांना आपल्या प्रतिष्ठा आणि अभिमानासोबत जोडून आपण आपल्या
देशवासीयांना समृद्ध करण्याचं माध्यम बनू शकतो, असं पंतप्रधान म्हणाले.
नुकत्याच
झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विक्रमी काम झाल्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी,
इतकं काम होणं हे भारतीय लोकशाहीची ताकत आणि लोकशाहीवर असलेला विश्वास दर्शवतो, असं
म्हटलं. दोन्ही सभागृहांचे अध्यक्ष, सर्व राजकीय पक्ष, सर्व खासदारांच्या सक्रिय भूमिकेबद्दल
पंतप्रधानांनी त्यांचं अभिनंदन केलं.
नुकत्याच
झालेल्या या दशकातल्या शेवटच्या सूर्यग्रहणाचाही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात उल्लेख
केला.
जानेवारी
महिन्यात साजरे होणारे विविध सण, महाराष्ट्रात संक्रांत, गुजरातमध्ये उत्तरायण, पंजाबमध्ये
लोहड़ी, तामिळनाडूमध्ये पोंगल, आणि आसाममध्ये माघ-बिहू, हे सण आपल्याला भारताचं ऐक्य
आणि विविधतेची आठवण करून देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
नवीन वर्ष,
नवीन दशक, नवीन संकल्प, नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन उत्साह - चला पुढे जाऊया, असं सांगून
पंतप्रधानांनी, देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल,
आज संध्याकाळी प्रख्यात चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना, नवी दिल्ली इथं दादासाहेब
फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय सिनेमाचे जनक धुंडिराज गोविंद
फाळके यांच्या नावानं हा पुरस्कार १९६९ मध्ये सुरू करण्यात आला होता. भारतीय सिनेमाच्या
विकासात उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार सरकारकडून देण्यात येतो. सुवर्ण कमळ आणि
दहा लाख रुपये रोख, असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
****
महाराष्ट्र
कर्नाटकच्या सीमाभागात सांगली इथून जाणाऱ्या एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. सीमाप्रश्नावर
सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आली आहे. कन्नड भाषिक
नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना गोळ्या घाला, असं वक्तव्य केल्यामुळे सीमेलगतच्या
भागात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापूर आणि सांगलीकडून कर्नाटकात येणाऱ्या बसेस सकाळपासून
बंद झाल्या आहेत. तसंच या मार्गांवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दररोज सांगली-बेळगाव
मार्गावर १२० एसटी बसेस ये-जा करतात, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथं बीबी
का मकबरा परिसरात इतिहासप्रेमींच्या वतीनं
हेरिटेज वॉकचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी साडेसात
वाजता या वॉकला सुरूवात झाली. यात इतिहास तज्ज्ञ डॉ. दुलारी कुरैशी आणि रफत कुरैशी यांनी बीबीका मकबऱ्याविषयी इतिहासप्रेमींना
मार्गदर्शन केलं.
****
No comments:
Post a Comment