Wednesday, 25 December 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25.12.2019 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ डिसेंबर २०१सकाळी ११.०० वाजता

****

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची पंच्याण्णवावी जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्तानं देशभरातून वाजपेयी यांना आदरांजली वाहिली जात आहे. १९९६ ला १३ दिवस, १९९८ ला ११ महिने आणि त्यानंतर १९९९ ते २००४ असं एकूण तीन वेळा वाजपेयी यांनी देशाचं पंतप्रधानपद भुषवलं होतं. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १९९८ ला पोखरण इथं दुसऱ्यांदा अणुचाचणी घेण्यात आली होती. देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून संयुक्त राष्ट्रसंघात हिंदी भाषेत भाषण करणारे ते पहिले भारतीय नेते होते. प्रभावी वक्ते, उत्तम लेखक, पत्रकार आणि संवेदनशील कवी, असलेले वाजपेयी यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. .

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्ली "सदैव अटल" या अटलजींच्या समाधीस्थळी जान त्यांना आदरांजली वाहिली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, इतर केंद्रीय मंत्री यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी अटलजींच्या समाधीला पुष्पांजली अर्पण केली.



शिक्षणतज्ज्ञ आणि स्वातंत्र्यसैनिक भारतरत्न पंडीत मदन मोहन मालवी यांनाही आज त्यांच्या जयंती दिनी आंदरांजली वाहण्यात येत आहे.

****

मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संयुक्त कार्यवाह, विनोदी अभिनेते अरविंदकुमार शर्मा यांचं काल मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते एक्याऐंशी वर्षाचे होते. शर्मा यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्तांच्या घरकुल बांधकामांसाठी राज्य सरकारने सत्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांना ऑगस्ट मध्ये आलेल्या महापुराचा १०४ गावांना फटका बसला होता. पुरामध्ये पूर्णत: पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी पंच्याण्णव हजार रुपये, तर अंशतः पडलेल्या घरांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे

****


No comments: