आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०१ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
नववर्ष
२०२० साठी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या
आहेत. या नवीन वर्षात आणि दशकात आपण शांतीपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध
होऊ, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
प्रत्येकानं
दयाळू आणि संवेदनशील व्यक्ती बनण्याचा संकल्प करावा,आणि पूर्ण विश्वाच्या शांती आणि
समृद्धीसाठी प्रार्थना करावी, असं आवाहन उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनी आपल्या
संदेशातून केलं आहे.
तर, हे
वर्ष आनंद आणि समृद्धीचं राहो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
****
सीडीएस
जनरल बिपिन रावत आज संरक्षण दल प्रमुख पदाचा पदभार स्वीकारत आहेत. संरक्षण दलांच्या तीनही शाखा एकजूट होऊन काम करतील,
असं रावत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
संरक्षण दल राजकारणापासून अलिप्त असतं आणि सरकारच्या आदेशानुसार काम करतं, असंही रावत
यांनी नमूद केलं. सीडीएस रावत यांनी यावेळी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
****
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी आज सकाळी कोरेगाव भीमा इथे भेट देऊन शौर्यस्तंभाला अभिवादन केलं तसंच
कोरेगाव भीमाच्या लढाईतल्या शहिदांना आदरांजली वाहिली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख
प्रकाश आंबेडकर यांनीही शौर्यस्तंभाला अभिवादन केलं.
कोरेगाव
भीमा इथे आज विजय स्मारकाला अभिवादन करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत. या
परिसरात पोलिस प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
****
नागरिकता
संशोधन कायद्याच्या समर्थनासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे येत्या दहा तारखेला राज्यभरात
फे-या काढण्यात येणार आहेत.केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ही माहिती दिली आहे.
नागरिकता कायदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला क्रांतीकारक निर्णय असल्याचं
सांगत, या कायद्याला समर्थन देण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात
रिपब्लिकन पक्ष फे-या काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जम्मू
आणि काश्मीरमधे एस.एम.एस. सेवा काल रात्रीपासून पूर्ववत सुरु झाली आहे.
कलम ३७०
हटवल्यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून, गेल्या ५ ऑगस्टपासून ही सेवा बंद करण्यात
आली होती.यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधल्या सगळ्या सरकारी रुग्णालयांमधली इंटरनेट ब्रॉडबँडसेवादेखील
सुरु झाली आहे.
****
No comments:
Post a Comment