Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 26 January 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक – २६
जानेवारी
२०२० दुपारी ०१.०० वाजता
****
सार्वभौम भारताचा
एकाहत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभर उत्साहात साजरा होत आहे.
राजधानी दिल्लीच्या
राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर राष्ट्रपतींनी तिन्ही सैन्य दलांची मानवंदना
स्वीकारली. राजपथावरील या संचलनाला प्रमुख पाहुणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो
यांच्यासह उपराष्र्टपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही राजपथावर
उपस्थित होते. या संचलनात सोळा राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालयांनी
सहभाग घेतला.
सर्व राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशांमध्येही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसून येत आहे.
****
औरंगाबाद इथं
पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आलं. यावेळी पोलिस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्ह्यात चार नव्या
औद्योगिक वसाहती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देसाई यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
चार नव्या औद्योगिक वसाहती या जिल्ह्यांमध्ये नव्याने
स्थापन करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती या
धासळल्या, नादुरुस्त झालेल्या त्याच्यातले अनेक तर पाडून नव्याने बांधल्या पाहिजे आणि
त्याचबरोबर असंख्य शाळांचे दुरुस्ती केली पाहिजे यासाठी उपलब्ध निधी मध्ये कशी वाढ
करता येईल याचा प्रयत्न सुरू केला आहे. आवास योजनाचं एकात्मिक असा विचार करून त्या
अधिक व्यापक कशा करता येतील. जे त्या योजना पासून दूर आहेत. त्यांना त्यामध्ये समाविष्ट
कसा करता येईल या आपल्या महत्वाकांक्षी ध्येयाकडे घेऊन कसा जाता येईल याचा विचार सुरू
केला आहे.
यावेळी गुणवत्तापूर्ण
सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झालेले सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, दहशतवाद विरोधी
पथकातले पोलिस निरीक्षक गौतम पातारे, औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातले सुभेदार प्रमोद
दादू गायकवाड यांचा आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध खेळाडूंचा देसाई यांच्या हस्ते सन्मान
करण्यात आला.
यानंतर पोलिसाचं
पथसंचलन झालं आणि शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
****
जालना इथं, पालकमंत्री
राजेश टोपे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते, परभणी
इथं पालकमंत्री नवाब मलिक, लातुरात पालकमंत्री अमित देशमुख, उस्मानाबादेत पालकमंत्री
शंकरराव गडाख, बीडला पालकमंत्री धनंजय मुंडे, तर हिंगोलीत पालकमंत्री वर्षा गायकवाड
यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी परेड निरीक्षण करून
जनतेला शुभेच्छा दिल्या.
धुळे इथं जिल्ह्याचे
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, तर अहमदनगर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या
हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या
औरंगाबाद खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण
करण्यात आलं. औरंगाबाद महानगर पालिकेत महापौर नंदकुमार घोडेले आणि आयुक्त आस्तिक कुमार
पांडेय यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झालं. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
आकाशवाणी औरंगाबाद
केंद्रात केंद्रप्रमुख जयंत कागलकर यांच्या हस्ते ध्वजाररोहण झालं. यावेळी अधिकारी,
कर्मचारी उपस्थित होते.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
आकाशवाणीवरून आज सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
No comments:
Post a Comment