आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या ७२ व्या स्मृतीदिनानिमित्त आज कृतज्ञ राष्ट्र त्यांना आदरांजली
अर्पण करत आहे. आजचा दिवस हुतात्मा दिवस म्हणूनही पाळला जातो. दिल्लीत राजघाट इथं गांधीजींच्या
समाधी स्थळी सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
संरक्षणमंत्री राजनाथसिंह,काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी
याठिकाणी गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
****
ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच आज पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झालं. त्या
८४ वर्षांच्या होत्या. मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या त्या संपादक असलेल्या विद्या
बाळ यांनी महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. पवार यांच्या
उपस्थितीत २०२०-२१ या आर्थिक वर्षाचं नियोजन
करण्यासाठी राज्यस्तरीय बैठक होणार आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचा प्रारूप आराखडा या बैठकीत अंतिम केला
जाईल. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, अन्य लोकप्रतिनिधी तसंच प्रमुख अधिकारी या बैठकीला
उपस्थित राहतील.
दरम्यान, पवार यांनी आज सकाळी ऑरिक सिटीतल्या कामकाजाची
पाहणी करून आढावा घेतला. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री सुभाष देसाई, जालन्याचे
पालकमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
****
राज्यातील नाशिक इथं थंडीचा कडाका वाढला असून आज ७ पूर्णांक
९ अंश सेल्सिअस तर निफाड इथं ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात
काल पासून थंडीत वाढ झाली आहे. ही थंडी रब्बी हंगामातील पीकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचं
या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment