आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ जानेवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्लीच्या करियप्पा संचलन मैदानात, पंतप्रधान नरेंद्र मोदी
आज एनसीसी अर्थात, राष्ट्रीय छात्रसेनेच्या संचलनाला उपस्थित राहणार आहे. यावेळी पंतप्रधानमंच्या
हस्ते प्रतिभावान छात्रसैनिकांना पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. त्यानंतर मोदी छात्रसेनेच्या
विविध तुकड्यांचं संचलन आणि मानवंदना पाहणार असून छात्रसैनिकांना मार्गदर्शन करणार
आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
गुजरातमधील गांधीनगर इथं आयोजित तिसऱ्या जागतिक बटाटा परिषदेचं उद्घाटन दूरदृश्य
संवाद प्रणाली द्वारे करणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत, बटाटा उत्पादनाशी
संबंधित सर्व घटकांना या क्षेत्राशी निगडीत बाबींवर विचार केला जाणार आहे. विविध १४
देशांमधले सुमारे १०० प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहे.
****
थोर स्वतंत्रता सेनानी लाला लजपतराय यांच्या जयंती निमित्त उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली
आहे. लाला लजपतराय यांच राष्ट्रप्रेम सर्व भारतीयांना प्रेरणा देत असल्याचं उपराष्ट्रपती
नायडू यांनी म्हटलं आहे. तर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लाला लजपत राय यांनी दिलेलं
प्राणांचं बलिदान सर्व भारतीयांना सदैव प्रेरणा देत राहील, असं पंतप्रधानांनी आपल्या
ट्वीटर संदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद भाजप शहराध्यक्षपदी संजय केणेकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी
विजय औताडे यांची निवड झाली आहे. औरंगाबाद इथं शहर आणि जिल्हा संघटनात्मक निवडणूक अंतर्गत
काल ही निवड करण्यात आली. पक्षाचे निवडणूक अधिकारी आमदार सुजीतसिंह ठाकूर यांनी केणेकर
तसंच औताडे यांना काल नियुक्ती पत्रं प्रदान केली.
****
खेलो इंडिया स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघातल्या सर्व
खेळाडूंना पुरस्कार देण्याची घोषणा राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी केली
आहे. या स्पर्धेत २४५ पदकं मिळवून महाराष्ट्र संघ प्रथम क्रमांकावर राहिला.
****
No comments:
Post a Comment