Saturday, 6 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 06.06.2020 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०६ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****

 देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दोन लाख छत्तीस हजार, सहाशे सत्तावन्न झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये यात विक्रमी नऊ हजार आठशे सत्त्याऐंशी रुग्णांची वाढ झाल्याची माहिती सरकारनं दिली आहे.
****

 देशात गेल्या चोवीस तासांमधे देशात कोरोना विषाणूमुळे दोनशे चौऱ्याण्णव रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या सहा हजार सहाशे बेचाळीस झाली आहे.
****

 पुण्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या आठ हजार ९६५ झाली आहे. काल या रुग्णांमधे दोनशे अठ्ठेचाळीस रुग्णांची वाढ झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे.
****

 अमरावती इथं कोरोना विषाणूचे तीन नवे रुग्ण आज आढळले आहेत. जिल्ह्यातील या रुग्णांची संख्या आता दोनशे त्र्यहात्तर झाली आहे.
****

 वर्धा जिल्ह्यातल्या वर्धमनेरी इथं कोरोना विषाणूचा एक नवा रुग्ण आज आढळला आहे. या व्यक्तीचा मुलगा नुकताच दिल्लीहून आला होता अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.
****

 कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सांगली इथं जिल्हा नियोजन समितीच्या 285 कोटी रुपयांच्या मूळ आराखड्यात बदल करण्यात आला. आता 94 कोटी रुपये जिल्ह्याच्या खर्चासाठी मिळणार आहे.
****

 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे नगरपरिषद उपाध्यक्ष गोपिनाथ लव्हाळे यांच्या विरोधात काँग्रेससह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन अविश्वास ठराव दाखल केला आहे. मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे हा प्रस्ताव सादर केला असून, यासाठी विशेष सभा घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.
****

 हिंगोली शहरात पावसाळ्यापुर्वी साफसफाई सोबतच पालिकेनं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे. काल सुरू झालेल्या या मोहीमेत पक्की बांधकामं पाडण्यात आली.
****

 केश कर्तनालयाचे दुकानदार आणि कारागिरांना दरमहा दहा हजार रुपये द्यावे, किंवा दुकान उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या शाखेनं शासनाकडे केली आहे. यासाठी आठ जूनला आंदोलनाचा इशाराही महामंडळानं दिला आहे.
*****

No comments: