Wednesday, 24 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी एकशे पंचवीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार नऊशे एकसष्ट झाली आहे. यापैकी दोन हजार एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एक हजार सहाशे एकोणीस रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहे. तर दोनशे सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.

यापैकी जामा मशीद परिसरात दहा, हर्षनगर सात, तर दिल्ली गेट सहा, हर्सुल कारागृह, संजय नगर, बायजीपुरा इथल्या चार रुग्णांचा समावेश आहे

वसंत नगर, जाधववाडी, गरम पाणी, बुढीलेन, गारखेडा या ठिकाणी प्रत्येकी तीन तसंच सराफा रोड, पुंडलिक नगर, सिद्धेश्वर नगर-जाधववाडी, विनायक नगर-देवळाई, रोजा बाग या भागातल्या प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

कुतुबपुरा, नागसेन नगर, बंजारा कॉलनी, व्हीआयपी रोड-ज्युबली पार्क, पडेगाव, संभाजी कॉलनी, एन सहा, विद्या रेसिडेन्सी, जुना बाजार, नारायण नगर, पद्मपुरा, इटखेडा, विष्णू नगर, सादात नगर, उल्का नगरी, संत तुकोबा नगर, एन दोन- सिडको, न्यू हनुमान नगर, लक्ष्मी नगर, गारखेडा, जयभीम नगर, टाऊन हॉल, राज नगर, नागेश्वरवाडी, एकता नगर, चेतना नगर, जाधववाडी, क्रांती नगर, म्हसोबा नगर, पोलिस कॉलनी, एन नऊ हडको, एन अकरा, एन तेरा, राज हाईट, विशाल नगर, हरिचरण नगर, गारखेडा, शिवाजी नगर, बेगमपुरा, नेहरू नगर, मयूर पार्क या भागातही प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडला आहे.

या बरोबरच ग्रामीण भागातल्या पैठण-६,  सिल्लोड -६, वाळूज-६, मांडकी-४, गंगापूर - ६, पळशी, कन्नड, पांढरी पिंपळगाव, पडेगाव, वैजापूर इथल्या इंदिरा नगर, पोलिस कॉलनी या भागातल्या प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये पन्नास स्त्री आणि पंच्याहत्तर पुरुष आहेत.
****
जळगाव जिल्ह्यात आज एकशे सहा तर नांदेड जिल्ह्यात आज सकाळी नवीन दोन रुग्ण आढळले
सातारा जिल्ह्यात आज पाच कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळुन आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
****
भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण नौकेवरच्या बारा प्रशिक्षणार्थींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पुण्याजवळ लोणावळा इथं सुमारे आठशे एकर परिसरात असलेल्या या प्रशिक्षण केंद्रात सुमारे पाच हजार लोक राहतात, यापैकी तीन हजार लोक नौदलाचे अधिकारी, कर्मचारी तसंच प्रशिक्षणार्थी आहेत. या पैकी सुटीवरून परतलेल्या आणि विलगीकरणात असलेल्या १५७ जणांच्या तुकडीतला एक प्रशिक्षणार्थी गेल्या अठरा तारखेला बाधित आढळला, त्यानंतर ही संख्या आता बारावर पोहोचल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशात कोविड ग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण छपन्न दशांश सात टक्के इतकं झालं असल्यांचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. आतापर्यंत दोन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याऐंशी रुग्ण बरं झाले असून सध्या एक लाख त्र्याऐंशी हजार बावीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या चार लाख छपन्न हजार एकशे त्र्याऐंशी झाली असून, चौदा हजार चारशे शहात्तर रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत वीरमरण आलेले सोलापूर जिल्ह्यातले सैनिक सुनील काळे यांच्या पार्थिव देहावर बार्शी तालुक्यात पानगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सरपंच सखुबाई गुजले, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद्र राऊत यांच्या सह अनेकांनी यावेळी सुनील काळे यांना श्रद्धांजली अर्पण केली. ग्रामस्थांनी शोकाकुल वातावरणात हुतात्मा सैनिकाला अखेरचा निरोप दिला.
****
औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मूत्रपिंड विकारावर उपचार घेत असलेल्या करिना वाघिणीचा आज सकाळी मृत्यू झाला. साडे सहा वर्ष वय असलेल्या या वाघिणीचा याच उद्यानातल्या प्राणी संग्रहालयात जन्म झाला होता. कोरोना संसर्ग चाचणीसाठी या वाघिणीच्या स्रावाचे नमुनेही घेतले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र शासनाचा २०१९-२० या वर्षीचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संगीत रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ नाट्य कलाकाराला दिला जातो. पाच लाख रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...