आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२३ जून २०२० सकाळी ११.००
वाजता
****
जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या कारवाईत दोन दहशतवादी
मारले गेले तर एका केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका सैनिकाला वीरमरण आलं. सुनिल काळे
असं या सैनिकाचं नाव असून, ते सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातल्या पानगांव इथले
रहिवासी आहेत. आज पहाटे साडेचार वाजता बंडजू भागात ही चकमक झाली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
163 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता
तीन हजार 819 झाली आहे. आज वाढलेल्या 163 रुग्णांपैकी 112 रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत
असून 51 रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. आतापर्यंत 2046 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तर 203 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
देशातला कोरोना बाधितांचा बरे होण्याचा दर ५६ पूर्णांक ३७ शतांश टक्यांपर्यंत
पोहोचला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. आतापर्यंत दोन लाख ४८ हजार
१९० रूग्ण या आजारातून बरे झाले आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासात देशात १४ हजार नवे
रूग्ण आढळले आहेत तर ३१२ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
****
कोविड १९ या आजारातून बरे
होण्याच्या टक्क्केवारीत राज्यात कोल्हापूर शहर प्रथम क्रमांकावर असून परभणी शहर दुसऱ्या
क्रमांकावर आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा आजारातून बरे होण्याचा दर ९० पूर्णांक चार दशांश
टक्के तर परभणी जिल्ह्याचा बरे होण्याचा दर ८७ पूर्णांक एक दशांश टक्के एवढा आहे. राज्याचा
रुग्ण बरे होण्याचा दर ४९ पूर्णांक ८० शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे.
****
राज्य उच्च आणि माध्यमिक शिक्षण मंडळाच्या, दहावी
आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल जुलै महिन्यात जाहीर केले जातील, असं, मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे
यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. बारावीचे
निकाल १५ जुलै पर्यंत तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत लावले जातील, असं त्या म्हणाल्या.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग १७ व्या दिवशी वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर
२० पैशानं तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ५५ पैशांनी वाढ झाली आहे
****
No comments:
Post a Comment