Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
June 2020
Time 1.00
to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२० दुपारी
१.०० वा.
****
कोरोना विषाणू संसर्गावर प्रभावी आयुर्वेदिक औषध तयार केल्याचा दावा योगगुरू
बाबा रामदेव यांनी केला आहे. आज हरिद्वार इथं पतंजली योग पीठ इथं पत्रकार परिषदेत त्यांनी या औषधांबाबत माहिती दिली. २८० रुग्णांच्या लक्षणांचा
वैद्यकीय नियंत्रित अभ्यास - क्लिनिकल कंट्रोल केस स्टडी तसंच शंभर रुग्णांवर वैद्यकीय
नियंत्रित चाचणी - क्लिनिकल कंट्रोल ट्रायल घेतल्यानंतर हे औषध तयार केल्याचं रामदेव
यांनी सांगितलं. या औषधांच्या सेवनाने तीन दिवसांत ६९ टक्के रुग्ण तर सात दिवसांत शंभर
टक्के रुग्ण संसर्गमुक्त झाल्याचा दावा रामदेव यांनी केला. कोरोलीन तसंच श्वासारी अशी
या औषधांची नावं असून, ही औषधं या पत्रकार परिषदेत प्रदर्शित तसंच वितरित करण्यात आली.
****
आपापल्या गावी परतलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी
केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘गरीब कल्याण
रोजगार अभियानात मराठवाड्याचा समावेश करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे
आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे. या मागणीचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांच्याकडे सादर केलं आहे.
देशातील सहा राज्यातील ११६ जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येणार
आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्थलांतरित मजुरांची संख्या २५ हजार असावी अशी अट सरकारने घातली आहे. मराठवाड्यातले सुमारे १० लाख मजूर मुंबई, पुणे, नाशिक, आदी जिल्ह्यात कामानिमित्त राहतात. सध्या हे
मजूरही गावी परतले आहेत, त्यांच्या हाताला काम मिळावं, यासाठी मराठवाड्यात ही
योजना लागू करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गोरखेडागाव इथल्या 66 वर्षीय कोरोना
विषाणू बाधित पुरूष रुग्णाचा काल रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातल्या विविध
खासगी रुग्णालयांत आतापर्यंत ५४, घाटी रुग्णालयात १४८ आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात
एक अशा एकूण २०३ कोरोनाबाधित रुग्णांचा आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या आता तीन हजार ८१९ झाली आहे. सध्या
एक हजार ५७० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवले आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 163 कोरोनाबाधित रुग्णांची
वाढ झाली. या रुग्णांमध्ये 55 स्त्री आणि 108 पुरुष आहेत. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये,
सिडको एन चार, जय भवानी नगर , बौद्ध नगर, जवाहर कॉलनी , बायजीपुरा, हमालवाडी, रेल्वे
स्टेशन परिसर , सिडको , तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी , उत्तम नगर , समर्थ नगर, म्हाडा
कॉलनी, अरिफ कॉलनी , कोटला कॉलनी , उस्मानपुरा , अंबिका नगर , पडेगाव , न्यू नंदनवन
कॉलनी , विष्णू नगर , उल्का नगरी , क्रांती नगर , औरंगपुरा , नक्षत्रवाडी , एन सहा, संभाजी कॉलनी , नानक नगर
, शिवनेरी कॉलनी, कॅनॉट प्लेस , न्यू विशाल नगर , श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी , राजेसंभाजी
कॉलनी, जाधववाडी , मयूर नगर, भानुदास नगर इथं
सात पद्मपुरा 5, नागेश्वरवाडी, चिकलठाणा हनुमान चौक , विजय नगर , सिडको महानगर हनुमान
नगर प्रत्येकी दोन ,गजानन नगर इथं सहा , तर जय भवानी इथं आठ आणि अन्य एक या भागातले कोरोनाबाधित आहेत.तर मांडकी ,सिद्धीविनायक
हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर इथं प्रत्येकी दोन, राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर
इथं पाच, ओयासिस चौक, पंढरपूर ,ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर प्रत्येकी एक, हनुमान मंदिराजवळ,
बजाज नगर, सारा गौरव, बजाज नगर प्रत्येकी दोन, जय भवानी चौक, बजाज नगर, पंचगंगा हाऊसिंग
सोसायटी, बजाज नगर, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर , संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज
नगर , बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर, वडगाव , विराज हाईट, बजाज नगर ,भाग्योदय हाऊसिंग
सोसायटी, बजाज नगर इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर इथं प्रत्येकी एक, दीपचैतन्य हाऊसिंग
सोसायटी, बजाज नगर (3), करमाड (6), फत्तेह मैदान, फुलंब्री (1), विवेकानंद कॉलनी, फुलंब्री
(1), कोलघर (2), गजगाव, गंगापूर (1), लासूर नाका,गंगापूर (1), लक्ष्मी कॉलनी, गंगापूर
(1), शिवूर बंगला (2), कविटखेडा, वैजापूर (1), शिवूर (5), मधला पाडा, शिवूर, वैजापूर
इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज सकाळी सेलू तालुक्यात दोन मुली कोरोना विषाणू
बाधित आढळल्या. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता
98 पर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, सेलु इथं हसमुख कॉलनी परिसर प्रतिबंधीत क्षेत्र
म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जाहीर केला.आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत आणखी
दोन रुग्णांची भर पडली. अहमदनगर शहरातल्या वाघ गल्ली नालेगाव इथली ३८ वर्षीय महिला
आणि अकोले तालुक्यातील काझी गल्ली, कोतुळ इथली ६५ वर्षीय महिलेचा अहवाल कोरोना बाधित
आला. आज जिल्ह्यातले ०४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. यामध्ये संगमनेर, राहाता,
शेवगाव आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या
रुग्णांची संख्या २४९ झाली आहे तर एकूण रुग्ण संख्या ३०४ इतकी झाली आहे.
****
जगन्नाथ पुरी इथल्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आज सकाळी पारंपारिक
विधींसह सुरूवात झाली. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर केवळ निवडक भाविक आणि पोलिस अधिकाऱ्यांनाच यात्रेचे
रथ ओढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment