Monday, 29 June 2020

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.06.2020....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

 २९ जून २०२० सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी आज सकाळी केलेल्या कारवाईत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. खुल चोहर या भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं नाकेबंदी करत शोधमोहीम सुरु केली असता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला त्याला सुरक्षा दलानं दिलेल्या प्रत्युत्तरात ३ दहशतवादी मारले गेले. या दहशतवाद्यांकडून १ ए के ४७ रायफल आणि २ बंदुका हस्तगत करण्यात आल्या असून अद्यापही शोध मोहीम सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज २०२ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यापैकी ११४ रुग्ण मनपा हद्दीतील आणि ८८ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या ५ हजार २३९ झाली आहे. यापैकी २ हजार ५५६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत २४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या २ हजार ४३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

जालना जिल्ह्यात १७ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या ५२१ झाली आहे. यापैकी ३३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

सातारा जिल्ह्यात आज नवे ३९ कोरोनाविषाणू बाधित रुग्ण आढळल्यानं, कोरोनाविषाणू बाधितांची एकूण संख्या १ हजार १२ झाली आहे. यापैकी २५७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, तर ७१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

****

राज्यात मुंबई नंतर ठाणे इथं कोविडचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. काल ठाणे जिल्ह्यानं ३० हजार रुग्ण संख्येचा आकडा पार केला, आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात १ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

****

एक जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीतल्या नियमित रेल्वे गाड्यांच्या आरक्षित तिकीटाचे सर्व पैसे प्रवाशांना परत करण्याचा निर्णय रेल्वे मंडळानं घेतला आहे.

****

No comments: