आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०४ जून
२०२० सकाळी ११.०० वाजता
****
निसर्ग चक्रीवादळ जळगाव जिल्ह्यामार्गे
मध्यप्रदेशकडे गेलं आहे. या चक्रीवादळाच्या परिणामी नाशिक, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबाद
जिल्ह्यात रात्री जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग मंदावल्याने सुदैवानं जीवित किंवा
वित्तहानी झाली नाही. दरम्यान, नाशिक शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
या चक्रीवादळामुळे रायगड
जिल्ह्यात श्रीवर्धन हरिहरेश्वर भागात मोठं नुकसान झालं. या भागातल्या आंब्यांच्या
बागांना वादळाचा मोठा फटका बसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातही
अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत.
****
पालघर जिल्ह्यातल्या वसई
विरार मध्ये आज सकाळ पासून पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई शहरात निसर्ग वादळानं ठिकठिकाणी
झाडे उन्मळून पडली असून आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतील गोरेगावमध्ये २०० कोरोना सैनिकांचे पथक नागरिकांसाठी
सुसज्ज करण्यात आलं आहे. यात पथकामध्ये डॉक्टर, नर्सेस, पोलीस, महानगरपालिका कर्मचारी
यांचा समावेश आहे.
****
औरंगाबाद
शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले नवीन ६३ रुग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातली रुग्णांची
संख्या १ हजार ७६७ झाली आहे. यापैकी १ हजार ११३ रुग्ण बरे झाले असून, ८९ रुग्णांचा
मृत्यू झाला आहे.
****
परभणी
जिल्ह्यात आज सकाळी दोन रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे,
यामध्ये परभणीतील मिलिंद नगर इथल्या एका रुग्णाचा तसंच पाथरी तालुक्यातल्या रामपुरी
इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रामपुरी ग्रामपंचायत
हद्द आज सकाळपासून प्रतिबंधित श्रेत्र म्हणून घोषित केलं आहे.
****
No comments:
Post a Comment