Friday, 5 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 05 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 ०५ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज अलिबागच्या दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडे बारा वाजता ते मांडवा इथं पोहोचतील. त्यानंतर थळ इथल्या नुकसानीची पाहणी करून मुख्यमंत्री अलिबागला पोहोचतील. अलिबाग इथल्या चुंबकीय वेधशाळेच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतील.
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी एकोणसाठ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाल्यानं एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता १ हजार आठशे अठ्ठावीस झाली आहे. यापैकी १ हजार एकशे सव्वीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. औरंगाबाद इथं कोरोना विषाणू संसर्गामुळे एका ३० वर्षाच्या गर्भवतीचा मृत्यू झाला. औरंगाबाद इथं या संसर्गामुळे मृतांची ९३ झाली आहे. औरंगाबादमध्ये सध्या सहाशे नऊ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आरोग्य विभागानं कोरोना विषाणू संसर्ग तपासणी मोहीम हाती घेतली आहे. फल उत्पादन आणि रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांची तपासणी करून या मोहिमेची सुरुवात आज सकाळी करण्यात आली. तसंच गावातल्या ५० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांची थर्मल आणि प्लस ऑक्सीमीटरनं यावेळी तपासणी करण्यात आली.
****
अमरावती इथं आज सकाळी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालांनुसार आणखी चार जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट झालं. यात ३ महिला तर १ पुरुष रुग्ण आहे. अमरावती मध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या दोनशे त्रेसष्ठ झाली आहे.
****
नांदेड शहरात काल भाजप युवा मोर्चाच्या वतीनं रक्तदान शिबीर घेण्यात आलं. खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिबीरात ४५ युवकांनी रक्तदान केलं.
****
जागतिक पर्यावरण दिवस आज पाळला जात आहे. या अनुषंगानं पर्यावरण संवधर्न जतन करण्याचं तसंच अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचं आवाहन पर्यावरणवादी संघटनांच्या वतीनं करण्यात येत आहे.
****


No comments: