Sunday, 25 October 2020

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 October 2020 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 October 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ ऑक्टोबर २०२० दुपारी १.०० वा.

****

विजया दशमी म्हणजे दसऱ्याच्या आजच्या उत्सवनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातल्या सतराव्या भागात संवाद साधताना दसऱ्याचा हा उत्सव, असत्यावर सत्याच्या विजयाचा उत्सव असल्याचं ते म्हणाले. हा एक प्रकारे संकटांवर धैर्यानं मिळवलेल्या विजयाचाही उत्स आहे. आज, आपण सर्व जण खूप संयमानं जीवन जगत आहात, एका मर्यादेत राहून सण, उत्सव साजरे करत आहात, म्हणून, जी लढाई आपण लढत आहोत, त्यात आपला विजयही अगदी निश्चित असल्याचं त्यांनी म्हटलं. सणांच्या या काळात अजून ईद आहे, कोजागिरी पौर्णिमा आहे, वाल्मिकी जयंती आहे, मग, दिवाळी, छटपूजा, गुरूनानक देवजी जयंती आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या या संकट काळात, आपल्याला संयमानंच वागावं लागणार आहे, मर्यादेतच रहावं लागणार आहे.

 भारताच्या अध्यात्म, योग, आयुर्वेदानं सर्व जगाला आकर्षित केलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेत चिन्मय पाटणकर आणि प्रज्ञा पाटणकर यांनी आपल्या घरातच मल्लखांब शिकवायला सुरूवात केली, तेव्हा, त्यांना इतकं यश मिळेल, याचा अंदाजही नव्हता. अमेरिकेत आज, अनेक ठिकाणी, मल्लखांब प्रशिक्षण केंद्रं चालत आहेत. अमेरिकेतले युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या खेळाशी जोडला जात आहेत, असं त्यांनी नमुद केलं. आज, जर्मनी असेल, पोलंड, मलेशिया अशा जवळपास २० देशांमध्ये मल्लखांब खूप लोक प्रिय होत आहे. आता तर, याची, जागतिक विजेतेपद स्पर्धाही सुरू करण्यात आली आहे, ज्यात, कित्येक देशांचे प्रतिस्पर्धी भाग घेतात, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी यावेळी केला. शीख गुरुंनी आपल्या जीवन आणि सत्कार्याच्या माध्यमातून देशात एकतेची भावना दृढ केल्याचं त्यांनी सांगितलं. शिखांच्या पवित्र स्थळांसमाविष्ट नांदेड साहेब गुरुद्वाराचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. मागच्या शतकात, आपल्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान विभूती होऊन गेल्या, ज्यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून एकत्र केलं, असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांना बोनस देणाऱ्या एका शेतकरी उत्पादक उद्योग कंपनीची माहिती त्यांनी यावेळी दिली. ही सुरुवात खूप मोठी असून यामुळे तळागाळातल्या शेतकऱ्यांच्या हिताचे, अनेक बदल होण्याच्या कशाप्रकारच्या शक्यता, या नव्या शेती विषयक कायद्यात आहेत, हे त्यांनी स्पष्ट केलं.  ्यांनी यावेळी देशाच्या विविध भागांमधल्या उल्लेखनीय व्यावसायिकांचा श्रोत्यांना परिचय करून दिला. तामिळनाडूमधे तुतुकुडी इथं केश कर्तनालय चालवताना ग्राहकांना ग्रंथालय उपलब्ध करून देणारे एक व्यावसायिक पोनमरियप्पन यांच्याशी पंतप्रधानांनी यावेळी संवादही साधला.

****

देशभरात गेल्या २४ तासात जवळपास ६२ हजार रुग्ण कोरोना विषाणू संसर्गमुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर ५० हजार रुग्णांची वाढ झाली आहे. देशभरात आता पर्यंत ७८ लाख ६४ हजार ८११ कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळले असून ७० लाख ७८ हजारांहून अधिक रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्के झाला आहे. देशात एकूण रुग्णसंख्येच्या ८ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांपेक्षा कमी रुग्ण सध्या उपचार घेत असून ही संख्या ६ लाख ६८ हजार आहे.

****

मुंबईत गेल्या २४ तासांमधे कोरोना विषाणू संसर्गाचे १ हजार २५७ नवे रुग्ण आढळले आहेत. या काळात ५० रुग्णांचा मृत्यू झाला असून ८९८ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. मुंबईतली रुग्णसंख्या आता कमी होत आहे. मुंबईत आतापर्यंत २ लाख ५० हजार ६१ रुग्ण आढळले असून एकूण मृतांचा आकडा दहा हजार १६ वर पोहचला आहे. आतापर्यंत २ लाख १९ हजार १५२ रुग्ण या संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. मुंबईत सध्या १९ हजार ५५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल १५१ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या आता ३७ हजार ३७६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून ३५ हजार ३६ रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे. औरंगाबादमध्ये सध्या १ हजार २८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोना विषाणुचे ९१ रूग्ण आढळले, त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्ण संख्या ८ हजार ९६७ झाली आहे. बुलडाण्यात आतापर्यंत १२० रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यु झाला असून ८ हजार २०४ रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे.

//***********//

 

No comments: