आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२९ ऑक्टोबर
२०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ७३ लाख १५ हजार रुग्ण आतापर्यंत बरे झाले
आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९० पूर्णांक ९९ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय
आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे कोरोना विषाणू संसर्गाचे
४९ हजार ८८१ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ऐंशी
लाखांहून अधिक झाली आहे.
****
देशात गेल्या चोवीस तासांमधे ५१७ रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्गामुळे
मृत्यू झाला असून मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या एक लाख २० हजार ५२७ झाली
आहे.
****
मराठवाड्यात काल ११ कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या
५७१ रुग्णांची नोंद झाली.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या
नेतृत्त्वाखाली पक्षाच्या एक शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची
आज राजभवनात भेट घेतली. वाढीव वीज देयकं, तसंच दूध दरवाढ, मंदिर प्रवेश, अकरावी प्रवेश आदी सर्वसामान्यांच्या प्रश्र्नांसदर्भात ही भेट घेतल्याचं तसंच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच राष्ट्रवादी
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं
आहे.
****
महिलांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवास देण्यासाठी मध्य रेल्वेनं सातत्यानं
प्रयत्न करून ‘मेरी सहेली’ कार्यक्रम सुरू केला आहे. रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केलेला
हा एक विशेष कार्यक्रम असून ‘मेरी सहेली’ ही महिला प्रवाशांची सतत सोबती म्हणून प्रवास
करणार आहे.
****
रेल्वे मंडळाकडून माल वाहतुक दरात पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे.
त्यामुळे सांगली जिल्ह्यात सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. दर रविवार सकाळी
दहा वाजून दहा मिनिटांनी किसान रेल्वे मिरजेतून कुर्डुवाडीमार्गे सुटणार आहे.
****
औरंगाबाद ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक गणेश गावडे यांची ठाणे शहर पोलीस
उपआयुक्त पदी बदली झाली आहे.
****
No comments:
Post a Comment