Monday, 26 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात गेल्या २४ तासात कोरोना विषाणू संसर्गाचे ४५ हजार १४९ नवे रुग्ण आढळले त्यामुळे देशातल्या कोविडग्रस्त रुग्णांची संख्या ७९ लाख ९ हजार ९६० झाली आहे. यापैकी ७१ लाख ३७ हजार २२९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ४८० रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, देशातला मृतांचा आकडा एक लाख १९ हजार १४ वर पोहचला आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या ३७ हजार ४८१ झाली आहे. यापैकी ३५ हजार ३७० कोविड बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील आजपर्यंत एकूण १ हजार ५५ जणांचा या संसर्गाने मृत्यू झाला असून, एकूण १ हजार ५६ रुग्णांवर जिल्ह्यात सध्या उपचार सुरू आहेत

****

मुंबईत गेल्या २४ तासांत एक हजार २२२ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ लाख ५१ हजार २८३ झाली असून एकूण मृतांचा आकडा दहा हजार ६२ वर पोहचला आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाच्या पालखी सोहळ्याला कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसतानाही पालखी मिरवणूक काढल्याबद्दल शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह इतर पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालखी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती.

****

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद राहणार नाही अशी माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा लिलाव बंद करण्यात येणार असल्याची अफवा सामाजिक संपर्क माध्यमांवर फिरत असल्याच्या पार्श्वभूमीवर दिघोळे यांनी ही माहिती दिली आहे. कांदा उत्पादक संघटनेचा याच्याशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

****

No comments: