आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑक्टोबर
२०२० सकाळी ११.००
वाजता
****
देशात आतापर्यंत ७२ लाख ६० हजारावर कोविडग्रस्त या संसर्गातून मुक्त झाले
आहेत. सध्या सक्रीय असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
१२ पटीने अधिक आहे. देशाचा कोविड मुक्तीचा हा दर ९० पूर्णांक ८५ शतांश टक्क्यांवर पोहोचला
आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३७
हजार ६६४ झाली आहे. यापैकी ३५ हजार ६२८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. जिल्ह्यात १
हजार ६३ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला असून सध्या ९७३ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत ८०१ कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळं येथील
एकूण रुग्णसंख्या २ लाख ५२ हजारावर पोहचली आहे. आतापर्यंत २ लाख २२ हजारावर रुग्ण संसर्गमुक्त
झाले असून १० हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १९ हजार २९० रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात आज पहाटे चार जणांनी कोविड कक्षाची
तोडफोड केली. जुहूगाव इथं राहणाऱ्या एका कोविडग्रस्ताचा या रुग्णालयात उपचारादरम्यान
मृत्यू झाल्यानं त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कोविड कक्षाची नासधुस केली. याप्रकरणी
वाशी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
****
सांगली जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेतून ९ हजार ८४५ घरकुल बांधण्याचे
उद्दिष्ट देण्यात आले आहे. या योजनेतल्या लाभार्थ्यांनी पंचायत समितीकडे आपले अर्ज
सादर करावेत, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी
केलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी टाटा मुंबई मॅरेथॉन फिलेंथ्रोपी पुरस्कारांचं
वितरण केलं. टाटा मुंबई मॅरेथान मंचाच्या वतीनं सामाजिक कार्यासाठी जास्तीत जास्त निधी
देणाऱ्या अनेक व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, तसंच सामाजिक संस्थांचा यात समावेश आहे.
****
जम्मू कश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात अरिबाग गावात सुरक्षा दलाच्या सैनिकांनी
काल रात्री दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर
सुरु केलेल्या शोध मोहिमेदरम्यान हि कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment