आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
२१
नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्य ‘हुतात्मा स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. मुंबईसह
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेने सर्वस्व पणाला लावून लढा
दिला. या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी प्राणार्पण केलं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी
आज मुंबईत हुतात्मा चौकात हुतात्मा स्मारकाला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव संजय कुमार, यांच्यासह
अनेक मान्यवरांनी हुतात्म्यांच्या स्मृतीला आदरांजली वाहिली..
****
देशात
गेल्या २४ तासांत कोविड संसर्ग झालेले ४६ हजार २३२ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे देशातला
कोविडग्रस्तांचा आकडा आता ९० लाख ५० हजार ५९८ झाला आहे. यापैकी ८४ लाख, ७८ हजार १२४
रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत, सध्या देशात ४ लाख ३९ हजार ७४७ रुग्णांवर उपचार सुरू
आहेत.
दरम्यान,
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद - आयसीएमआरे काल एका दिवसात १० लाख ६६ हजार २२ नमुन्यांची
कोविड तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण १३ कोटी ०६ लाख ५७ हजार ८०८ चाचण्या करण्यात
आल्या आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ४२ हजार १८० झाली आहे. यापैकी
आजपर्यंत ४० हजार ३६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार
१२९ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या ६८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
अजिंठा
वेरुळसह सर्व पर्यटनस्थळं खुली करावीत, असं आवाहन ज्येष्ठ कवी ना धों महानोर यांनी
केलं आहे. या मागणीचं पत्र महानोर यांनी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांना लिहिलं
आहे. पर्यटन स्थळांच्या परिसरात राहणारी अनेक कुटुंबं रोजगाराअभावी भरडली जात असल्याकडे
महानोर यांनी या पत्रातून लक्ष वेधलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या २८२ शिक्षकांच्या कोरोनाविषाणू चाचण्या काल घेण्यात
आल्या, या चाचण्यांच्या अहवालातून कोणाही शिक्षकाला कोविड संसर्ग झाला नसल्याचं स्पष्ट
झालं आहे. २३ नोव्हेंबर पासून जिल्ह्यात ९ वी, १० वीचे वर्ग सुरू करण्याचा विचार शासन
करत आहे.
****
No comments:
Post a Comment