Friday, 21 June 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.06.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

२१ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता

****

योग हा समाजात सकारात्मक बदलाचे नवे मार्ग तयार करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात योग हा आपल्या मर्यादित परिघातून बाहेर पडला असून, जगभरात योगाच्या लाभाबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. या भाषणानंतर पंतप्रधानांसह जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी योगाभ्यासात सहभागी झाले होते.

****

योग दिन आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. स्वत:साठी आणि समाजासाठी योग ही यंदाच्या योग दिवाची संकल्पना आहे. सैन्यदलात पायदळाच्या सैनिकांनी लडाख मध्ये तर नौदलानं आयएनएस विक्रांतवर योगासनं केली.

****

नागपूर इथं परिवहन मंत्री नितीन गडकरी, तर मुंबईत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी योगाभ्यास प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. मरीन ड्राईव्ह झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग दिनाच्या शुभेच्छा देत, योग हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग व्हावा, असं मत व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

छत्रपती संभाजीनगर इथंही विभागीय क्रीडा संकुलासह विविध उद्यानं, शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये आज योगाभ्यास करण्यात येत आहे. मराठवाड्यात लातूर इथं जिल्हा क्रीडा संकुलात, नांदेड इथं श्री गुरुग्रंथ साहिबजी भवनात तर जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलावर सामुहिक योग आणि प्रात्यक्षिकं करण्यात आली.

****

वाशिम जिल्ह्यात नागपूर - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तराळा फाट्याजवळ दोन खाजगी बस आणि ट्रकच्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. आज सकाळच्या सुमारास एक ट्रॅव्हल रस्त्याच्या बाजुने उभी असताना, मागून वेगाने येणाऱ्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली, यामुळे ही खाजगी ट्रॅव्हल्स समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकून हा अपघात झाला. जखमी प्रवाशांवर मंगरूळपीर इथल्या आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. अपघातामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...