Sunday, 14 July 2024

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर संक्षिप्त बातमीपत्र १४ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

 कायद्याची तत्त्वं सामान्यांना सोप्या भाषेत समजावून सांगता येत नसतील, तर कायदे शिक्षण आणि व्यवसायात त्रुटी आहेतअसं प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केलं आहे. ते काल लखनौ इथं डॉक्टर राम मनोहर लोहिया राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलता होते. प्रादेशिक भाषांमध्ये कायदा शिकवण्याच्या गरजेवर त्यांनी यावेळी बोलतांना भर दिला. सरन्यायाधीश म्हणून आपण सामान्यांसाठी न्याय प्रक्रियेच्या सुलभतेसाठी  अनेक सूचना जारी केल्या असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालायाचे इंग्रजीतले निर्णय भाषांतरीत केल्यानं जनतेला ते समजत असल्याचं न्यायमूर्ती म्हणाले.

****

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल रात्री झालेल्या गोळीबारात जखमी झाले आहेत. या गोळीबारात एक ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनियातील बटलर इंथं सुरू असलेल्या आपल्या प्रचार सभेत त्यांच्यावर एका बंदुकधाऱ्याने गोळी झाडली. त्यास सुरक्षा रक्षकांनी ठार केलं आहे.

****

मराठवाड्याच्या अनेक भागात विजांच्या कडकडाटासह तसंच विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

मुंबई, ठाणे, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर, नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. अहमदनगर तसंच जळगाव जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे.

परवा मंगळवारपर्यंत कोकण, गोवा, मध्य-महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.

दरम्यान, आज नागालँड, ओडिशा आणि छत्तीसगड, तेलंगणात जोरदार पावसाचा अंदाज आहे. आज आणि उद्या कर्नाटकच्या किनारपट्टीवर आणि दक्षिण कर्नाटकात अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

****

इंग्लंडमध्ये आयोजित विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा क्रेचिकोव्हा हिनं पटकावलं. तिनं काल अंतीम फेरीत  इटलीच्या जस्मिन पाओलिनीचा पराभव केला.

महिलांच्या दुहेरीत चेक प्रजासत्ताकच्या केटरीना सिनियाकोव्हा आणि अमेरीकेच्या टेयलर टाउनसेंड या जोडीनं विजेतेपद पटकावलं.

स्पर्धेत पुरुष दुहेरीत इग्लंडचा हेन्री पॅटन आणि फिनलँडच्या हॅरी हेलीयोवारा या जोडीनं विजेतेपद पटकावलं.

तर आज, पुरुष ऐकरीतील अंतीम सामना सर्बीयाच्या नोवाक जोकोवीच आणि  स्पेनच्या कार्लोस अल्काराज यांच्यात सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे.

मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात मेक्सीकोच्या सॅन्टीआगो गोन्जालेसच्या सोबत गिऊलिआना ओलमॉस हीची चीनची जोडी आणि पोलंडच्या जॅन झेलीन्स्की ह्याच्या सोबत तैपैच्या सु वि हेह हिची जोडी असा सामना रंगणार आहे

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 29.04.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 29 April 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्र...