Thursday, 11 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 11.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

११ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील.

****

रायगड जिल्ह्यातील पंढरपूर - भोर- महाड राष्ट्रीय महामार्गावर वाघजाई इथे दरड कोसळून रस्ता खचला असून या मार्गावरची वाहतूक धोकादायक झाल्यानं महाडला भोरशी जोडणारा वरंध घाट ३१ ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, कोकण रेल्वेमार्गावरची वाहतूक पूर्ववत करण्यात काल यश आलं.

****

दुधाला १ जुलै पासून तीस रुपये दर देण्याबाबत यापूर्वीच शासन निर्णय झाला आहे. यासह पाच रुपये अनुदानही दिलं जाणार आहे. हा लाभ दूध उत्पादकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासंदर्भात दूध प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी तपासणी करण्यात येईल, असं दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल यासंदर्भातल्या बैठकीत सांगितलं.

****

नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरात जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण पथकानं काल धाडी टाकून कोटपा २००३ कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या एकूण १६ तंबाखू विक्रेत्यांना ८ हजार ४०० रुपये दंड आकारला.

****

आसाममध्ये पुरामुळं गेल्या चोवीस तासांत आणखी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत या ठिकाणी पुरामुळं ८४ जण दगावले आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 26.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 26 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...