Friday, 12 July 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 12.07.2024 रोजीचे सकाळी:11.00,वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

संक्षिप्त बातमीपत्र

१२ जूलै २०२ सकाळी ११.०० वाजता

****

विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजेपासून मतदान सुरू झालं आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत आणि विधानसभा सदस्य त्यासाठी मतदान करणार आहेत. विजयी होण्यासाठी उमेदवारांना पहिल्या पसंतीची २३ मत मिळवणे आवश्यक आहे. दुपारी ४ पर्यंत मतदान होणार असून त्यानंतर लगेच सायंकाळी मतमोजणी होणार आहे.

****

दिल्ली मद्य धोरण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ईडीनं केलेल्या अटकेच्या विरोधातील केजरीवाल यांची याचिका वरच्या पीठाकडं सोपवण्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे.

****

भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी अधिकारी पुजा खेडकर यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक सदस्यीय समिती नेमली आहे. केंद्र सरकारच्या अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे. पुजा खेडकर या २०२३ च्या तुकडीच्या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्यावर गैरवर्तवणूक तसंच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दिलेल्या प्रमाणपत्राबाबत आरोप आहेत, ही समिती आपला अहवाल दोन आठवड्यात सादर करणार आहे.

****

नीट पेपरफुटी प्रकरणी हजारीबाग इथल्या ओएसिस शाळेचे प्रचार्य अहसानूल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज यांच्यासह चौघांची रवानगी पाटण्यातील तुरुंगात केली आहे. या चौघांचीही सीबीआय रिमांड पूर्ण झाली आहे. सीबीआयनं त्यांना २८ जून रोजी हजारीबाग इथून अटक केली होती.

****

विदर्भातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल रमेश बैस यांनी काल तत्वत: मंजुरी दिली. याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांचे आभार मानले आहेत. विदर्भातील सहा जिल्ह्यांना जोडणार्या ८० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे जवळपास साडे तीन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल, पिण्याचे पाणी तसेच सिंचनाचे मोठे प्रश्न यातून सुटणार आहेत. तसंच या प्रकल्पाच्या कालव्याद्वारे सौर ऊर्जा निर्मिती होणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

पत्रकारांसाठी महामंडळ बनावं याकरिता येत्या आठवड्याभरात चर्चा करून मार्ग काढू, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. माध्यमकर्मी कल्याणकारी मंडळासाठी,वेलफेअर बोर्ड मिडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पत्रकार शीतल करदेकर यांनी यासंदर्भात आझाद मैदान इथं उपोषण केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर करदेकर यांनी उपोषण मागं घेतलं आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 27 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...