Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 14 July 2024
Time
18.10 to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी
छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १४ जूलै २०२४
सायंकाळी ६.१०
****
·
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाचा
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
·
शेअर गुंतवणुकीतून शेकडो जणांची फसवणूक करणाऱ्या भामट्यास
अटक
·
छत्रपती संभाजीनगर इथं म्हाडाची परवा मंगळवारी संगणकीय
सोडत
आणि
·
अखेरच्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचं झिम्बॉब्वेसमोर
१६८ धावांचं आव्हान
****
आषाढी
एकादशीचा सोहळा येत्या बुधवारी साजरा होत आहे. या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी आज पंढरपूर इथं जाऊन वारकऱ्यांसाठीच्या सोयी सुविधांचा तसंच एकूणच यात्रेच्या
नियोजनाचा आढावा घेतला. आपल्या या दौऱ्यात करकंब इथं मुख्यमंत्र्यांनी संत निळोबाराय
यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधला. मंत्री दादा भुसे तसंच
गिरीश महाजन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
आषाढी
एकादशीनिमित्त राज्याच्या कोनाकोपऱ्यातून निघालेल्या पालख्या पंढरपुरात दाखल होत आहेत.
अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून रुक्मिणी मातेची पालखी ७०० किलोमीटरचा प्रवास करत, आज पंढरपुरात
दाखल झाली. मुक्ताईनगर इथून ३५ दिवसांचा प्रवास करून संत मुक्ताई यांची पालखीही आज
पंढरपूर इथं दाखल झाली. ही पालखी बंधू भेटीसाठी १६ तारखेला वाखरी इथं जाऊन, पुन्हा
पौर्णिमेपर्यंत पंढरपुरात मुक्कामी राहणार आहे.
****
दरम्यान, वाखरी
इथं संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा शेवटचा मुक्काम असतो. यावर्षी
शेवटच्या मुक्कामासाठी १२ लाखांपेक्षा जास्त वारकरी येण्याचा अंदाज शासनानं वर्तवला
आहे. त्या अनुषंगानं साोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून वाखरी-
टाकळी जवळ ५२ एकर परिसरात पालखीतळाची संकल्पना राबवण्यात येत आहे. या ठिकाणी २४ तास
आयुर्वेदिक तेलाने पादाभ्यंग करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसंच मुक्कामी येणाऱ्या
दिंड्यांना रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सुविधा आणि भोजन व्यवस्थेसाठी स्वतंत्र प्रशासकीय
यंत्रणा उभारण्यात आली आहे.
****
‘मुख्यमंत्री
तीर्थ दर्शन योजना’ राज्य सरकारने जाहीर केली आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात
आला. या योजनेतून राज्यातल्या सर्व धर्मातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना भारतातील
तीर्थक्षेत्रांची यात्रा मोफत करता येणार आहे.
****
शिवसेना
पक्ष आणि चिन्हाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेसह आमदार
अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवसेना
पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर १५ जुलै रोजी सुनावणी होणार
होती, ही सुनावणी आता १४ ॲागस्ट रोजी होणार आहे. तसंच आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा
अध्यक्षांच्या या निकालाविरोधात दाखल याचिकेवर १९ जुलैला सुनावणी होणार होती. आता ही
सुनावणी २३ जुलै रोजी होणार आहे.
****
दिव्यांगत्वाचं
बनावट प्रमाणपत्र देऊन प्रशासकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्या
विरोधात दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी राज्य दिव्यांग
आयुक्तालयाकडे तक्रार केली आहे. खेडकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे सुपूर्द केलेली
दिव्यांगं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं आढळल्यानंतर त्यांच्या वैद्यकीय तपासणीचे
आदेश आयोगानं दिले होते.
****
शेअर बाजारातल्या
गुंतवणुकीतून जास्त परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत, शेकडो
जणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता विभागानं आशिष शहा या
व्यक्तीला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ किलो ९०० ग्रॅम सोनं
आणि २५ लाखांची रोकडही जप्त केली. शहा याच्या चौकशीत त्यानं आत्तापर्यंत जवळपास ४००
ते ५०० जणांची फसवणूक केल्याचं निष्पन्न झालं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना, २० टक्के
सर्वसमावेशक योजना आणि म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवा मंगळवारी संगणकीय सोडत
काढण्यात येणार आहे. १ हजार ४९४ गाळे, सदनिका, निवासी
भुखंडाचा यात समावेश आहे. फेब्रुवारी-२०२४ च्या जाहिरातीला अनुसरुन ऑनलाईन प्राप्त
झालेल्या अर्जाच्या संगणकीय सोडतीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण मंत्री
अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य
अधिकारी मंदार वैद्य यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
****
भारत-
झिम्बाब्वे क्रिकेट टी-ट्वेंटी पाच सामन्यांच्या मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात
झिम्बाब्वेनं नाणेबाजी जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम
फलंदाजी करत निर्धारित षटकात सहा बाद १६७ धावा केल्या. भारतानं या मालिकेत तीन-एक अशी
विजयी आघाडी घेतली आहे.
****
विम्बल्डन
टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा आज अंतिम सामना आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर
असलेला नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या कार्लोस अल्काराझ यांच्यादरम्यान थोड्याचवेळात
सामन्याला सुरुवात होत आहे. नोवाक जोकोविचनं अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसची बरोबरी करत, सातवेळा
विम्बल्डनचं जेतेपद पटकावलं आहे. तर, अल्काराझ सलग दुसऱ्यांदा
विम्बडल्डच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सर्वाधिक आठवेळा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा
विक्रम स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररच्या नावावर आहे. भारताच्या लिएंडर पेसने पुरुष
तसंच मिश्र दुहेरीत एकूण पाच वेळा तर महेश भूपतीने पुरुष तसंच मिश्र दुहेरीत एकूण तीन
वेळा तर सानिया मिर्झाने महिला दुहेरीत एकदा विम्बल्डनचं विजेतेपद पटकावलं आहे.
****
कझाकस्तान
इथं झालेल्या ३५ व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतानं १ सुवर्ण आणि
३ रौप्यपदकं पटकावली आहेत. मुंबईच्या वेदांत साक्रेनं सुवर्ण, तर रत्नागिरीचा
इशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजीथ शिवकुमार आणि उत्तर प्रदेशातल्या बरैलीचा यशश्वी कुमार या तिघांनी
रौप्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेत एकंदर ८० देशांच्या ३०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला
होता.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं आषाढी एकादशीनिमित्त शहरातल्या बालाजी मंदिरात ‘माझा एक लाडू विठ्ठलाला’
हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात येतो. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी
आज या उपक्रमाला भेट देऊन उपक्रम राबवणाऱ्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून
पंढरपूर इथं पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना या लाडूचे वाटप करण्यात येते. यावळी आयोजक
मनोज सुर्वे, लक्ष्मीकांत सुर्वे यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते.
****
प्रधानमंत्री
पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात कालपर्यंत ६ लाख २८ हजार ३५८ शेतकऱ्यांनी विमा उतरवला
आहे. यात ४ लाख १७ हजार ५०६ हेक्टर शेतजमीनीचा समावेश आहे. केवळ १ रूपयांत विमा काढण्याची
मुदत उद्या संपत आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही विमा
काढला नाही त्यांनी विमा भरून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं
आहे.
****
मुख्यमंत्री
माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे
निर्देश नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
यांनी दिले आहे. यासंदर्भात शहरी तसंच ग्राम समित्यांनी शिबिरांचं आयोजन करावं अशा
सूचनाही महाजन यांनी दिल्या आहे.
****
आगामी
विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवणार
असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा समाजवादी पार्टीचा विचार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील परंडा विधानसभा
मतदारसंघावर आमचा दावा राहणार असल्याची माहिती समाजवादी पार्टीचे राज्य कार्याध्यक्ष
प्रतापराव होगाडे यांनी दिली. ते आज धाराशिव येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
लातूर
इथं ‘माझं लातूर, हरित लातूर’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. यासाठी आज
शहरात ‘हरितोत्सव’ उपक्रम घेण्यात आला. यात नागरिकांना विविध प्रकारची रोपे तसंच वृक्ष
लागवडीसाठी लागणारे आवश्यक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं. नागरिकांचा
या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला
****
अहमदनगर
जिल्ह्यात आज श्रीरामपूर बंद आंदोलन करण्यात आलं. गुणवत्तेच्या आधारे श्रीरामपूर जिल्ह्याची
घोषणा करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्यावतीनं हे आंदोलन करण्यात
आलं. माजी खासदार सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, स्वाभिमानी
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती यात सहभागी झाले होते.
****
पुणे जिल्ह्यात
झिका विषाणूजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात या आजाराचे एकूण २१
रूग्ण आढळले असून यापैकी १९ रुग्ण पुणे जिल्ह्यात, एक रुग्ण
कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेर इथं सापडला आहे, अशी माहिती
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
****
मुंबई
शहर आणि उपनगरातत संततधार पावसामुळं काही भागात पाणी साचलं आहे. दादर आणि प्रभादेवी
रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळे पश्चिम रेल्वेची सेवा
काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली.
सिंधुदुर्ग
जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरू काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. तेरेखोल नदीनं
इशारा पातळी ओलांडली आहे.
****
No comments:
Post a Comment