Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 21 January 2020
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– २१ जानेवारी २०२० सकाळी ७.१० मि.
****
** तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचं पंतप्रधानांचं
विद्यार्थ्यांना आवाहन
** परीक्षा पर चर्चा कार्यक्रमात कन्नडच्या विद्यार्थिनीच्या
प्रश्नाला पंतप्रधानांचं दिलखुलास उत्तर
** राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री
सचिवालय कक्ष’ स्थापन
आणि
** पाथरी तीर्थक्षेत्र
विकास आराखड्यास हरकत नसल्याची शिर्डी ग्रामस्थांची भूमिका
****
तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केलं आहे. परीक्षा पर चर्चा या कार्यक्रमात काल
नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी, विद्यार्थ्यांना दररोज
किमान एक तास तंत्रज्ञानापासून दूर राहून, त्या वेळात मित्रांची प्रत्यक्ष भेट घ्यावी,
पाळीव प्राण्यांशी किंवा उद्यानात खेळावं, पुस्तकं वाचावीत, तसंच कुटूंबासोबत वेळ घालवावा,
असं सांगितलं. परीक्षेच्या निकालात मिळणारे गुण, हेच सर्वस्व नाही, असं पंतप्रधानांनी
स्पष्ट केलं. परीक्षांमुळे येणाऱ्या ताणावर नियंत्रण कसं मिळवावं, याविषयी त्यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथल्या जवाहर नवोदय विद्यालयात
शिकणारी विद्यार्थीनी प्रेरणा मनवर हिला या कार्यक्रमात पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची
संधी मिळाली, प्रेरणाने विचारलेला प्रश्न आणि या प्रश्नाला पंतप्रधानांनी दिलेल्या
उत्तराचा हा संपादित अंश ऐकूया....
Good Morning Sir, My Name is Prerana Manvar.
I’m student of class 12 science from Javahar Navoday Vidyalay kannad
Aurangabad,Maharashtra .
Sir, my parents always say that I should wake
up early in the morning for study. But I’m a night owl. I can’t wake up early
in the morning. Sir, What should I do.
कितना निर्द्रोष सवाल मुझे पुछा गया है. इस सवाल का
मतलब है की “परीक्षा पे चर्चा” यह कार्यक्रम सफल है जरूरी नहीं की आपको सुबह पढ़ना है
या रात को पढ़ना है हर एक की अपनी विशेषताए होती है, अपनी आदते होती है और जिसमें
comfort है उसमे पढ़ो सिध्दांत है की सुबह पढ़ो
अगर आप comfort नहीं तो काहे परेशान हो भाई, रात को पढ़ो उससे ज्यादा मुसीबत है की हम
पढ़ने ज्यादा हम ना पढ़ने के बहाने ढूंढते रहते और वो पुरा बोझ हम परिवार पे दाल देते
है और हम उन चिजो को अपनोम पर लेंगे और आदत बदलेंगे तो जरुर लाभ होगा
प्रेरणा शिकत असलेल्या कन्नडच्या नवोदय विद्यालयाचे मुख्याध्यापक
जे एस पाटील यांनी प्रेरणाचा या कार्यक्रमातला सहभाग आपल्या विद्यालयासाठी अभिमानास्पद
असल्याचं सांगितलं, तर प्रेरणाचे वडील प्रदीप मनवर यांनी हा अविस्मरणीय अनुभव असल्याची
भावना व्यक्त केली. ते म्हणाले....
माझा साठी तर ही फार अभिमानची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी
माझे नाव सुचित नव्हत मी एक साधा शिक्षक आहे.परंतु माझ्या मुलीने माझे नाव महाराष्र्टात
नाही तर संपूर्ण भारतात माझ नाव उंचावल. आम्हाला पाहावे, आम्हाला दिसावे अशी तिची इच्छा
असेल तिथे माझा मुलीला त्यांच्याशी संवाद साधणयाची संधी मिळाली ही आमच्यासाठी फार मोठी
गोष्ट आहे.
पंतप्रधानांच्या या कार्यक्रमात
सहभागी होण्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली होती, या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातून अर्जुन थोरात, नचिकेत पाटील,
जय जगदीश पारीख, श्रेयस पांडव, जयेंद्र खोमणे, आणि नांदेड जिल्ह्यातली विद्यार्थिनी
ऐश्वर्या मुंडकर या सर्वांना परीक्षा पर चर्चा कार्यक्रमात सहभागी होता आलं.
****
भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा
यांची काल सर्वानुमते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. भाजपचे निवडणूक
प्रभारी राधामोहन सिंह यांनी त्यांना ही निवड झाल्याचं प्रमाणपत्र दिलं. राष्ट्रीय
अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या ज्येष्ठ
नेत्यांनी नड्डा यांचं अभिनंदन केलं आहे.
****
दिल्लीतल्या निर्भया लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणात
फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला चौघां दोषींपैकी एक पवन गुप्ता, याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावली. गुन्हा घडला
तेंव्हा किशोरवयीन होण्याचा दावा या दोषीनं एका याचिकेतून केला होता. या प्रकरणातील
चारही दोषींना येत्या एक फेब्रुवारी रोजी फाशी देण्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात
आले आहेत.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
प्रशासकीय कामात लोकाभिमुखता, पारदर्शकता आणि गतिमानता
आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त कार्यालयात ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’
स्थापन करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना आपले मुख्यमंत्र्यांना संबोधून करण्यात येणारे
अर्ज तसंच निवेदनं या विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात देता येणार आहेत. हे अर्ज
किंवा निवेदनं संबंधित क्षेत्रीय स्तरावरील यंत्रणेकडे योग्य कार्यवाहीसाठी त्वरित
पाठवले जाणार असून, त्यावर कार्यवाहीबाबत लोकशाही दिनी आढावा घेण्यात येईल.
****
दरम्यान, सातबारावरच्या कर्ज नोंदीमुळे फेरफार अद्ययावत होत नसलेले, नांदेड जिल्ह्यातले शेतकरी
धनाजी जाधव यांची समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवली आहे. जाधव
यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. नांदेडचे
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी महसूल यंत्रणा, संबंधित बँक आणि जाधव यांच्यात समन्वय साधून, वस्तुनिष्ठता तपासून सातबारावरची
नोंद अद्ययावत केली. त्यामुळे, जाधव यांचा शेतीविषयक कामांचा मार्ग मोकळा झाला.
****
परभणी जिल्ह्यातल्या
पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास हरकत नसल्याची भूमिका
शिर्डीच्या ग्रामस्थांनी जाहीर केली आहे. काल मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. पाथरीच्या
विकासाला औरंगाबाद इथल्या विभागीय आढावा बैठकीत दिलेली मंजुरी ही त्या भागाच्या
विकासासाठी होती असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तर आमदार
राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना, साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत
शासनाची यापूर्वी कुठलीच भूमिका नव्हती आणि यापुढेही ती
तशीच असावी असा मुद्दा
उपस्थित केला.
दरम्यान, पाथरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला
शंभर कोटी रुपये निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, भाजपचे परभणी जिल्हाध्यक्ष
आनंद भरोसे यांनी केली आहे. या मागणीचं निवेदन त्यांनी काल परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे
सादर केलं.
****
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे नागरिकत्व
सुधारणा कायदा लागू केला जाणार नाही, असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नांदेडचे
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात मागील
आठवडाभरापासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची
चव्हाण यांनी काल भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.
****
राज्य ग्रामपंचायत
कर्मचारी संघटनेच्या हिंगोली शाखेतर्फे काल विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न, निवृत्ती वेतन, सुधारीत किमान वेतन आणि भविष्य निर्वाह
निधी रक्कम यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलं आहे.
****
सकल ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी काल जालना
इथं गांधीचमन चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं. माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी
आंदोलन स्थळी आंदोलकांची भेट घेतली. मुलांना मोफत शिक्षण, वसतीगृह, सुशिक्षित बेरोजगारांसाठी
आर्थिक विकास महामंडळ, आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी
शिवसेनेचे मारुती लक्ष्मण कागेरू तर उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत
लालू वाघमारे यांची काल बिनविरोध निवड झाली. सहा जानेवारी रोजी निवडणूक प्रक्रिया सुरू
होण्यापूर्वी गोंधळ झाल्यानं काल कडक पोलिस बंदोबस्तात निवडणूक घेण्यात आली.
****
लातूर इथं जिल्हा वार्षिक सर्वसाधारण
योजनेअंतर्गत दोनशे बत्तीस कोटी रुपये निधी मंजूर झाला असून त्यापैकी सुमारे साडे ८५ कोटी रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा वार्षिक
योजना २०१९–२० अंतर्गत विकास निधीचा आढावा घेण्यात आला,
त्यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी ही माहिती दिली.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उस्मानाबाद
इथं काल जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयात तोडफोड केली. खरीप पीक विम्यातून वगळण्यात
आल्यानं कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली, मात्र अद्याप या प्रकरणी कारवाई झाली नसल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या बरबडा इथं
आज चौथं राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन होत आहे. प्राचार्य नारायण शिंदे यांच्या
अध्यक्षतेखाली होत असलेल्या या संमेलनात कथाकथन, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
होणार आहेत.
****
नगरसोल ते नांदेड
ही रेल्वे आज परभणी ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात
आली आहे. तसंच काही गाड्या उशीरानं धावणार आहेत. लिंबगाव ते चुडावादरम्यान रेल्वेमार्गाच्या कामासाठी तीन तासांचा लाईन
ब्लॉक घेण्यात येणार असल्यानं, हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड-तिरूपती-नांदेड या विशेष रेल्वेला येत्या एक एप्रिलपर्यंत दोन शयनयान श्रेणी आणि एक थ्री टायर वातानुकूलीत डबा जोडण्यात येणार आहे, रेल्वे
विभागाकडून ही माहिती देण्यात आली
****
गुवाहाटी इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया
क्रीडा स्पर्धेत कालच्या सलग ११व्या दिवशी ६३ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र पदकतालिकेत
अव्वल स्थानावर आहे. महाराष्ट्राच्या केनिशा गुप्ता आणि वेदांत बाफना यांनी काल
जलतरणात सुवर्णपदकं मिळवली.
****
No comments:
Post a Comment