Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
औरंगाबाद इथं आज पाच कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांचा
मृत्यू; मृतांची एकूण संख्या ५५
Ø
देशात दररोज तीन लाखाहून
अधिक पीपीई किट आणि एन्-९५ मास्कचं उत्पादन
Ø
तामिळनाडूत अडकलेले महाराष्ट्रातले ६८३ प्रवासी परभणी
इथं दाखल; नांदेडहून विशेष श्रमिक रेल्वे बिहारकडे रवाना
आणि
Ø
परभणी जिल्ह्यात उद्या सकाळी ७ वाजेपासून तीन दिवस
पूर्ण संचारबंदी
****
औरंगाबाद इथं गेल्या बारा तासांत कोरोना विषाणूग्रस्त
पाच रुग्णांचा मृत्यू झाला, यामध्ये ३४ वर्ष वयाच्या महिलेचाही समावेश आहे. आता औरंगाबाद
जिल्ह्यात या आजाराने मरण पावलेल्यांची संख्या ५५ झाली आहे. यापैकी शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय घाटीत ५०, चिकलठाणा इथल्या मिनी घाटी रुग्णालयात एक, तर चार रुग्णांचा
खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं, प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातल्या
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज १६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात
आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेराशे एक झाली आहे.
****
नाशिक शहरातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या
तीन जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं आढळलं आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या
कालावधीत बाजार समिती आवारात स्वच्छता मोहीम आणि जंतुनाशक फवारणी करण्यात येणार आहे.
या बाजार समितीतून मुंबईच्या बाजारात भाजीपाला पुरवला जातो.
****
धुळे शहरातल्या चितोड
रोड परिसरात कोरोना
विषाणू संसर्ग झालेला रुग्ण आढळल्याने, हा भाग प्रतिबंधित क्षेत्र
म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागात महापालिकेच्या
वतीनं
फवारणी करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यात आज ११ नवे रुग्ण आढळले असून, एकूण
कोरोनाग्रस्ताची संख्या १७५ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात शहरात बाहेरून येणाऱ्या विशेषत:
रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. शहरी भागातलं वाढतं संक्रमण बघता
पुन्हा आरोग्य सर्वेक्षण प्रारंभ करण्यात आलं असून २ हजार २४२ संशयितांचे घशातल्या
स्रावाचे नमुने आले.
****
देशात दररोज तीन लाखाहून अधिक
पीपीई किट आणि एन्-९५ मास्कचं उत्पादन केलं जात असल्याचं आरोगय मंत्रालयानं सांगितलं
आहे. राज्य
तसंच केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १११ लाख एन ९५ मास्क तसंच ७४ लाख ४८ हजार पीपीई
उपकरणांचा पुरवठा करण्यात आला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, अखिल भारतीय आयुर्विज्ञान
परिषद आयसीएमआरनं देशात आतापर्यंत ३० लाख ३३ हजार ५९१ लोकांची चाचणी करण्यात आल्याचं सांगितलं.
आतापर्यंत ५७ हजार ७२१ लोक कोविड-19च्या संक्रमणातून बरे झाले आहेत. देशात कोरोनाबाधितांची
एकूण संख्या एक लाख ३८ हजार ८४५ झाली असल्याचंही मंत्रालयानं नमूद केलं आहे.
****
मुंबई आंतरराष्ट्रीय
विमानतळावरून देशांतर्गत विमानसेवा सुरु झाली.
दोन महिन्यांच्या खंडानंतर मुंबई विमानतळाच्या टर्मिनल क्रमांक २ वरून आज
एकूण ५० विमानं उतरणार असून, तेवढीच विमानं उड्डाण करणार आहेत. दुपारी एक
वाजेपर्यंत सुमारे १ हजार ९०० प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं
आहे. दुपारपर्यंतच्या सात विमानांमधून २६६ प्रवासी मुंबईला आले, तर १३ विमानांमधून
१ हजार
६१३ प्रवासी मुंबईहून विविध राज्यांमध्ये गेल्याचं या वृत्तात नमूद आहे. ८०
वर्षांपेक्षा वयस्कर नागरिक, आजारी असलेले लोक आणि गर्भवतींना सध्याच्या परिस्थितीत
प्रवास टाळण्याचा सल्ला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ
व्यवस्थापनाने दिला आहे.
पुणे विमानतळावरून आज १७
विमानांद्वारे प्रवासी वाहतुक होणार आहे. दुपारपर्यंत चार विमानांद्वारे ३५४
प्रवासी पुण्यात दाखल झाले, तर तीन विमानांतून ६२२ प्रवाशांनी पुण्यातून प्रस्थान
केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर
तामिळनाडूत अडकलेल्या विविध जिल्ह्यातल्या ६८३ प्रवाशांचं आज सकाळी साडेनऊ वाजता मदुराई
एक्सप्रेसद्वारे परभणी रेल्वेस्थानकावर आगमन झालं. यात बीड जिल्ह्यातले ३१०, हिंगोलीतले
६०, वाशिममधील २९, यवतमाळ इथले ०४, लातूर इथले २५, उस्मानाबादेतले २१, नांदेडमधले ०९,
परभणीतीले १९७, बुलडाण्यातील २५ आणि जालना जिल्ह्यातल्या ०३ प्रवाशांचा समावेश आहे.
संबंधित जिल्हा स्थानावरुन आलेल्या बसेसद्वारे हे प्रवाशी आपल्या मूळ गावी रवाना झाल्याची
माहिती उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांनी दिली.
****
नांदेड इथून एक हजार
२९ प्रवाशी घेऊन विशेष श्रमिक रेल्वे आज साडे अकरा वाजता बिहारकडे रवाना झाली. ही गाडी
पाटणा, गया, मार्गे आरारी रेल्वे स्टेशन पर्यंत जाणार आहे. गाडीतल्या १ हजार ४६० प्रवासाची
तिकिटं नांदेड जिल्हा प्रशासनाने काढली होती. यापैकी १हजार२९ प्रवासी रवाना झाले. गाडीत
मागील अडीच महिन्यापासून नांदेडच्या लंगर साहेब गुरुद्वारात अडकुन पडलेल्या १५० पेक्षा
आधिक प्रवांशाचा समावेश होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित
केलं जात आहे.
****
परभणी शहरासह जिल्ह्याच्या
विविध भागात इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. तपासणीनंतर यापैकी काही
व्यक्ती कोरोनाबाधित आढळून येत असल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाची शक्यता नाकारता
येत नाही. यामुळे जिल्ह्यात उद्या सकाळी ७ वाजेपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी
लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आज हे आदेश काढले. परभणी शहर
महानगरपालिका आणि लगतचा पाच किलोमीटर परिसर, तसंच जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषद, नगर
पंचायत हद्द आणि ३ किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू राहील. अत्यावश्यक सेवांना यापूर्वी
देण्यात आलेली सूट या संचारबंदीतही कायम राहील. या काळात कोणीही व्यक्ती, वाहने रस्त्याने,
बाजारामध्ये घराबाहेर आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची
भेट घेतली. राज्यपालांच्या आमंत्रणावरून घेतलेली ही सदिच्छा भेट होती, असं पक्षाचे
ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी राजभवनाबाहेर पत्रकारांना सांगितलं. या बैठकीत कोणत्याही
राजकीय मुद्यांवर चर्चा झाली नाही, असंही पटेल यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
संसदेच्या स्थायी
समित्यांच्या नियमित बैठका सुरु व्हाव्यात यासाठी उपराष्ट्रपती एम.एम.व्यंकय्या
नायडू यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सचिवालयांनी केलेल्या तयारीचा आढावा
घेतला. अशा बैठका सुरु करण्याची शक्यता, बैठका सुरु झाल्या तर त्यासाठीचे नियम, या
मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीला येणाऱ्या सदस्यांची संख्या कमीत कमी
असावी यावरही बैठकीत चर्चा झाली.
****
चालू खरीप हंगामासाठी
औरंगाबाद जिल्ह्यात बँकातर्फे पीक कर्ज वाटप सुरू आहे. कोरोनो विषाणू प्रादुर्भावाला
प्रतिबंध घालण्यासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध
करून देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी केसीसी डॉट सेतु ऑनलाईन डॉट कॉम या संकेतस्थळावर
पीक कर्ज मागणीची नोंदणी करावी, असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी
केली आहे. या शेतकऱ्यांची यादी जिल्हा अग्रणी बँकेमार्फत संबंधित बँकेकडे पाठवण्यात
येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना बँकेकडून संदेश पाठवला जाईल, त्यात दिलेल्या तारखेला
शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह बँकेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री
किसान योजनेचा लाभ घेतला आहे परंतु त्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळाला
नव्हता, अशा सर्व शेतकऱ्यांना या संकेतस्थळावरून सदर योजनेचा लाभ घेता येणार असल्याचं,
या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कोरोनाविषाणू संसर्गाच्या
पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या मुस्लीम बांधवांनी आजची पवित्र रमजान ईदची नमाज
आपापल्या घरीच सामाजिक अंतर पाळत आदा केली. यंदा गळाभेट आणि हस्तांदोलन करण्याचे टाळून
दुरूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या गेल्या.
लातूर जिल्ह्यात ईद
उल फित्रची नमाज ईदगाहवर पठण न करता, मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करून रमजान
ईद साजरी केली.
परभणी जिल्ह्यात पाथरी
इथं शारीरिक अंतर राखून रमजान ईदची नमाज अदा करण्यात आली..
वाशिम अमरावती या ठिकाणी
देखील मुसिम बांधवांनी घेरीच नमाज अदा केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे
****
नांदेड इथं मातंग ग्रुप
डेव्हलपमेंट परिवार आणि रशिया ग्रुप नांदेड यांच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त
शिक्षक शिवा कांबळे यांच्या नेतृत्वात नांदेड शहरातील हमालपुरा, गांधीनगर आणि पंढरपूर
नगरातील ६५ गरजू आणि गरीब समाजबांधवांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं. गहू, तांदूळ,
साखर, साबण आदि साहित्याचा यामध्ये समावेश होता
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ - सीबीएसईच्या दहावी तसंच बारावीच्या परीक्षेसाठी आता केंद्रीय मनुष्यबळ विकास
मंत्रालयानं परीक्षा केंद्रांची संख्या वाढवली आहे. या परीक्षा आता देशभरातल्या १५
हजार केंद्रांवर घेण्यात येणार आहेत. आधी या परीक्षांसाठी ३००० परीक्षा केंद्र निश्चित
करण्यात आली होती. सुरक्षित अंतर आणि विद्यार्थ्यांचं
प्रवासाचं कमी अंतर व्हावं, यासाठी मंत्रालयानं परीक्षा केंद्र वाढवली असल्याचं पीटीआयच्या
बातमीत म्हटलं आहे. येत्या एक जुलै ते १५ जुलै दरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात आज आणखी ६ कोरोना विषाणू बाधीत
रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातल्या कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १३३ झाली
आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी दिली. आज किनवट तालुक्यातल्या
देहली तांडा इथला एक, माहूर तालुक्यातील वडसा इथला एक, नांदेडच्या इतवारा भागातील दोन,
मित्तलनगर एक, आनंद कॉलनी एक तर जिजामाता कॉलनीत एक रुग्ण आढळून आला. तर एन आर आय यात्री
निवासातल्या कोविड सुश्रुषा केंद्रातले चार रूग्ण बरे झाले आहेत. त्यांना आज रुग्णालयातून
सुटी देण्यात आली आहे, असं शेळके यांनी सांगितलं.
****
यवतमाळ इथल्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल असलेल्या
१६ जणांचे कोरोना विषाणू संसर्ग तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज सकाळी हे अहवाल
वैद्यकिय महाविद्यालयाला प्राप्त झाले.
****
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून ६९५ रुग्ण कोरोना
विषाणूमुक्त होऊन घरी परतले आहेत. या विभागात १ हजार ५०० कोरोना विषाणू बाधित रुग्ण
आढळले होते,
*****
***
No comments:
Post a Comment