आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ मे २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
तीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे बाधितांची संख्या एक हजार
तीनशे साठ इतकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
आज आढळलेल्या
रुग्णांमध्ये सुभाषचंद्र बोस नगर परिसरात - ४, जय भवानी नगर - ३, शिवशंकर कॉलनी, जहागीरदार
कॉलनीत प्रत्येकी दोन, तर मिसारवाडी, सिध्देश्वर नगर, जाधववाडी, शहानवाज मशीद परिसर,
सादात नगर, भवानीनगर-जुना मोंढा, जुना बाजार, ईटखेडा परिसर, जयभीम नगर, अल्तमश कॉलनी,
शिवनेरी कॉलनी एन-9, टिळक नगर, एन-4 सिडको, रोशन गेट परिसर, सादाफ नगर रेल्वे स्टेशन
परिसर, हमालवाडी, भाग्यनगर, समता नगर, या भागात
प्रत्येकी एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात गंगापूर तसंच सिल्लोड
इथंही प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये नऊ महिला आणि एकवीस
पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
****
सातारा जिल्हयात
आज आणखी बावन्न जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित
रुग्णांची संख्या झाली तीनशे चौऱ्यॉण्णव इतकी झाली असून, आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू
झाला आहे.
****
जळगाव जिल्ह्यातल्या
भडगाव इथं सात व्यक्ती कोरोना विषाणू बाधित आढळल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातल्या बाधित
रुग्णांची संख्या चारशे नव्व्याण्णव इतकी झाली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात
मुंबईहून आलेल्या तीन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे, नोडल
अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी ही माहिती
दिली. आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून आलेल्या एकोणीस व्यक्ती कोरोना
विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे, जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण
संख्या पंच्च्याहत्तर झाली आहे.
****
रत्नागिरी
शहरात सहा आणि संगमेश्वर तालुक्यात दोन असे आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले असून
जिल्ह्यातल्या एकूण बाधित रुग्णांची संख्या एकशे त्र्याऐंशी झाली आहे.
****
देशाचे पहिले
पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज छपन्नावी पुण्यतिथी आहे. २७ मे १९६४ रोजी
त्याचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित नेहरु यांना एका ट्वीट
संदेशातून अभिवादन केलं आहे.
****
No comments:
Post a Comment