आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ मे २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज ३५
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या १ हजार ३९५ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये बायजीपुरा, मिसारवाडी, वाळूज महानगर, बजाज
नगर, संजय नगर, शहागंज, हुसेन कॉलनी, कैलास नगर, उस्मानपुरा, इटखेडा, सिटी
चौक, नाथ नगर, बालाजी नगर, साई नगर एन सहा, करीम कॉलनी रोशन गेट, अंगुरी बाग, तानाजी
चौक, बालाजी नगर इथं प्रत्येकी १, रोकडिया हनुमान कॉलनी, नारळीबाग, रेल्वे स्टेशन परिसर,
संभाजी कॉलनी, एन सहा, जय भवानी नगर इथं प्रत्येकी २, एन-4 इथं ३, तर हमालवाडी इथं
४ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १४ महिला आणि २१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. शहरात काल ५६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत
८६७ जण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून आतापर्यंत ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
****
अकोला जिल्ह्यात काल ७२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे
जिल्ह्यातील कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५०७ झाली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या
पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून १० लाख रुपयांची मदत देण्यात येत
आहे. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जळगाव इथ बोलतांना दिली. कोरोना विषाणू
बाधित पोलिसांना पोलीस कल्याण निधीतून १ लाख रुपये अग्रिम स्वरुपात देण्याची सुविधा
उपलब्ध करण्यात आली असून आतापर्यंत कल्याण निधीतून ३ कोटी रक्कम कोरोना विषाणू बाधित
पोलिसांना अग्रीम स्वरुपात देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज १३७ वी जयंती.
यानिमित्तानं सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
सावरकर यांना ट्वीटरवरून आदरांजली अर्पण केली.
धाडसी वृत्ती, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी अनेकांना प्रवृत्त करणं, आणि सामाजिक
सुधारणांसाठी वीर सावरकर सदैव स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी या संदेशात म्हटलं
आहे.
****
No comments:
Post a Comment