Monday, 25 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 24 MAY 2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार, आणखी २८ जणांना  कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता १ हजार दोनशे बहात्तर इतकी झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये न्याय नगर, गारखेडामधल्या २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन-दोन, सिडको इथले ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना रोड १, संभाजी कॉलनी, सिडको १, महेश नगर १, जुना बाजार १, एमजीएम परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, शकुंतला नगर, शहानूरवाडी १, औरंगपुरा २, आशियाद कॉलनी, बीड बायपास इथल्या एका रुग्णाचा, तर जिल्ह्यातल्या वडगाव कोल्हाटी इथल्या २, तर सिल्लोड मधल्या एका रुग्णाचा समावेश आहे. २८ रुग्णांमध्ये १३ महिला, तर १५ पुरूष रुग्ण आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल एकाच दिवशी ५० जणांचा वैद्यकीय अहवाल कोरोनाबाधित असा आला आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या आता १५१ झाली असून, एकोणनव्वद जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या हिंगोलीत ६२ जणांवर उपचार सुरु आहेत. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये मुंबईहून परतलेल्या २२, औरंगाबाद इथून परतलेल्या चार, रायगड इथून परतलेला एक, कर्नाटकातल्या बिदरहून आलेला एक, तर भिरडा इथल्या रुग्णाच्या संपर्कातल्या दोघांसह एका डॉक्टरचा समावेश आहे.
****
लातूर इथं आणखीन २ जणांना कोरोना विषाणु ची लागण झाली आहे. त्यामुळे लातूर मधल्या कोरोनाबाधितांची संख्या आता ८२ झाली आहे. यापैकी ३६ जण उपचारानंतर बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २ जणांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे तर सध्या ४५ जणांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्याच्या उमरी तालुक्यातल्या नागठाणा बुद्रुक इथल्या मठातले निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराज यांची आज पहाटे २ वाजेच्या सुमारास हत्या झाली. गावातल्याच एका तरुणानं चोरीच्या उद्देशानं ही हत्या केल्याचा संशय असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. याच मठातल्या स्वच्छतागृहात आणखी एक मृतदेह आढळला असून, भगवान शिंदे असं या मृताचं नाव आहे.
****

No comments: