Friday, 29 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 29 MAY 2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २९ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी ४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १ हजार ४५३ झाली आहे. यापैकी ९०१ रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून सध्या ४८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
****
नांदेड जिल्ह्यात आज आणखी पाच नवीन कोरोनाविषाणू बाधीत रूग्ण आढळून आले. हिंगोली जिल्ह्यातले दोन रुग्ण नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता नांदेड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४३ झाली आहे.
****
बीड शहरात लागू केलेल्या संपूर्ण संचारबंदी आदेशात सुधारणा करून, दूध विक्रेते आणि परवनाधारक भाजीपाला तसंच फळ विक्रेत्यांना त्यातून वगळण्यात आलं आहे. शहरात फिरते दूध विक्रेते तसंच घरोघरी दूध पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली आहे, मात्र दूध विक्रीची दुकानं उघडता येणार नाहीत असा आदेश जिल्हादिकारी राहुल रेखावार यांनी दिला आहे.
****
सांगली जिल्ह्याच्या तासगाव इथल्या एस टी आगारातल्या वाहतूक निरीक्षक मीना पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. एस टी आगाराच्या कार्यालयात बसून टिक टॉकवर आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याबद्दल विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ही कारवाई केली. आक्षेपार्ह संवादांचा वापर करून मीना पाटील यांनी हा व्हिडीओ तयार केल्याच समोर आलं आहे.
****
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख याचं आज पहाटे इथं निधन झालं, ते ८५ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड इथून आज सायंकाळी ४ वाजता पश्चिम बंगालसाठी विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहे. अशी माहिती नांदेड तहसील कार्यालयाने दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा रविवारी ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रातला हा बारावा भाग आहे.
****
नैॠत्य मोसमी वाऱ्याच्या प्रवाहाला सध्या पोषण वातावरण निर्माण झाल्यानं हीच परिस्थिती राहीली तर एक जूनला केरळमध्ये मोसमी पावसाचं आगमन होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****



No comments: