Monday, 25 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 MAY 2020 TIME – 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२५ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आज १६ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता तेराशे एक झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
आज आढळलेल्या रुग्णांमध्ये सुभाषचंद्र बोस नगर, एन–11, हडको इथले ४ रूग्ण, भवानी नगर इथं दोन रूग्ण , तर रोशन गेट, हुसेन कॉलनी, बायजीपुरा, इटखेडा-पैठण रोड, अल्तमश कॉलनी, जवाहर नगर- गारखेडा परिसर,  शाह बाजार, मयूर नगर एन-6, सिडको, राम नगर एन – 2, आणि गजानन मंदिर परिसर, इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यापैकी १० महिला तर सहा पुरूष रुग्ण आहेत.

दरम्यान, देशभरात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासांत कोरोना विषाणू बाधा झालेले सहा हजार ९७७ नवीन रुग्ण आढळले. एका दिवसांत आढळलेली आजवरची ही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. यामुळे आता देशभरातली रुग्णसंख्या १ लाख ३८ हजार ८४५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत चार हजार २१ रुग्ण या आजाराने दगावले असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुस्लिम बांधवांचा ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण आज साजरा होत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा सण घरातच साधेपणानं साजरा करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. औरंगाबाद इथं मध्यवर्ती कारागृहात रमजान ईद निमीत्त आज  सामुहिक नमाज पठण करण्यात आलं, यावेळी सामाजिक अंतर राखण्याचा नियम पाळला गेला नसल्याचं दिसून आलं.
****
नाशिक शहरातील पंचवटी भागात एका कोरोना विषाणू बाधित वृद्धाचा आज मृत्यू झाला. त्यामुळे शहरात या आजारानं आतापर्यंत मरण पावलेल्यांची एकूण संख्या पाच झाली आहे.
****
बुलडाणा जिल्हयाच्या खामगाव तालुक्यात जळका भडंग या गावातले ८ जण कोरोना विषाणू बाधीत झाले आहेत, त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव सील केलं आहे. या गावामध्ये १ तरुण पुण्याहून आल्यानंतर, त्याच्या सह कुटुंबातले ७ सदस्य कोरोना विषाणू बाधीत झाले असल्याचं आढळून आलं आहे. जिल्ह्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ४४ झाली असून, यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे, तर २६ जण बरे होऊन घरी परतले आहेत.
****

No comments: