आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२६ मे २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज २२
जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची
एकूण संख्या एक हजार ३२७ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये एन ८ सिडको, नवीन वस्ती
जुनाबाजार इथं प्रत्येकी ४, जुना मोंढा, बायजीपुरा, रोहिदासपुरा, कांचनवाडी, भारतमाता
नगर हडको, जुना हनुमान नगर, हनुमान चौक, न्याय नगर, कैलास नगर, रामनगर, रोशन गेट, एन
११ सुभाषचंद्र नगर, पुंडलीक नगर, भवानी नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण असून आज आढळलेल्या
रुग्णांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत औरंगाबाद शहरात
७७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून सध्या ४९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी
१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाल्यानं जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ७४
झाली आहे. बाधितांमध्ये शहरातल्या जुना जालना भागातल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित
पाच जणांचा समावेश आहे.
****
नांदेड जिल्ह्यात काल आणखी
सहा कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या
१३३ झाली आहे.
****
परभणी शहरासह जिल्ह्यात आज
सकाळी ७ वाजेपासून गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी
दीपक मुगळीकर यांनी काल हे आदेश काढले.
****
देशात लागू असलेल्या संचारबंदीच्या
काळात आरोग्य सुविधा जास्त मजबुत केली गेली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन
यांनी सांगितलं आहे. केन्द्र आणि राज्य सरकारनं ७ हजार १३ कोविड केंद्रांव्यतिरिक्त
३ हजार २७ कोविड रूग्णालय तसंच कोविड आरोग्य केंद्र उभारले असल्याची माहिती त्यांनी
दिली.
****
दरम्यान, मुंबईत पुढच्या
दोन आठवड्यात सात हजार खाटांची एकूण क्षमता असलेले अनेक कोविड सुश्रुषा केंद्र आणि
रुग्णालयं कार्यरत होणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार महालक्ष्मी
रेसकोर्स, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंड आदी उपनगरी भागात ही सुश्रुषा केंद्र सुरू होणार
आहेत.
****
No comments:
Post a Comment