Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
**
राज्य सरकारचं ‘मिशन बिगीन अगेन’ नवं
धोरण; तीन टप्प्यात राज्यातल्या टाळेबंदीची
तीव्रता कमी करण्याची घोषणा
**
रेड झोनमधल्या शहरातही दुकाने आणि अन्य व्यवहार सुरू करण्यास परवानगी; मात्र प्रतिबंधित
क्षेत्रात कोणतीही सवलत नाही
**
विद्यापीठस्तरीय पदवी, पदविका, पदव्युत्तर विषयांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द;
सेमिस्टरमधल्या गुणांच्या आधारे सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्याचा निर्णय
**
विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर
- मुख्यमंत्री
**
राज्यात दोन हजार ४८७ नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण; उपचारादरम्यान ८९ रूग्णांचा
मृत्यू
**
औरंगाबादमध्येही तीन जणांचा मृत्यू तर ४५ नवे रूग्ण
**
हिंगोली, जालना, परभणी, नांदेड आणि उस्मानाबादमध्येही रूग्णांच्या संख्येत वाढ
**
कोविड १९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज- पंतप्रधान नरेंद्र
मोदी
** हिंदी चित्रपट सृष्टीतले नव्या दमाचे संगितकार,
गायक वाजिद खान यांचं मुंबईत निधन
आणि
**
राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन; जालना
आणि परभणी जिल्ह्यात वीज अंगावर पडून दोन जणांचा मृत्यू
****
केंद्र
सरकारप्रमाणेच राज्य सरकारनंही राज्यात ३० जूनपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचबरोबर
नवी सुरूवात करण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ नावानं नवं धोरणही राबवण्याचा ठरवलं आहे.
या धोरणानुसार आता तीन टप्प्यात टाळेबंदीची तीव्रता कमी करण्यात येणार आहे.
चौथ्या
टाळेबंदीच्या काळात राज्य सरकारनं रेड झोन वगळता अन्य भागात विविध व्यवहार आणि सेवा
सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर आता रेड झोनमध्ये येणाऱ्या मुंबई महापालिकेसह
महानगर परीसर, औरंगाबाद, पुणे, सोलापूर, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती,
आणि नागपूर या महानगरपालिकांच्या हद्दीत व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय
घेतला आहे. मात्र प्रतिबंधित -कंटेन्मेंट झोनमध्ये टाळेबंदीचे कडक पालन केले जाणार
असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.
मिशन बिगीन अगेनचा
पहिल्या
टप्प्याची सुरुवात परवा 3 जून पासून होणार आहे टप्प्यात काही अटींवर बीच सरकारी किंवा
खासगी मैदानं गृहनिर्माण सोसायट्यांचे मैदान अशा ठिकाणी सायकलिंग जॉगिंग धावण्याचा
यासारखे व्यायाम करण्यास परवानगी असेल सकाळी 5 ते 7 या वेळेत हा व्यायाम करता येईल
समूहाने कोणती कृती करता येणार नाही एकमेकांमध्ये अंतराच्या नियमाचं पालन करत स्वयंरोजगाराचा
व्यवसाय कार्यरत असलेल्या प्लंबर इलेक्ट्रिशियन पेस्ट कंट्रोल आणि तांत्रिक व्यवसायिकांना
आपलं काम करता येईल वाहन दुरुस्ती ची गॅरेज वर्कशॉप ही सुरू करता येतील पण तत्पूर्वी
वाहन दुरुस्ती बाबत ची पूर्वसूचना वाहनधारकांना द्यावी लागेल अत्यावश्यक सेवेमध्ये
येणारे सरकारी कार्यालय वगळून इतर सर्व सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के किंवा कमीत
कमी 15 कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल
मिशन बिगीन अगेनचा दुसरा टप्पा 5 जून पासून सुरू होईल या मध्ये काही अटींवर सकाळी नऊ ते संध्याकाळी
पाच वाजेपर्यंत सर्व दुकाने आणि बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहेत मात्र
यामध्ये मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल त्यांना परवानगी नसेल सर्व दुकाने आणि बाजारपेठा
एक दिवस एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसर्या बाजूची आधारावर सुरू करण्यासाठी परवानगी
असणार आहे कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही तसेच एकदा खरेदी
केलेले कपडे बदलण्यासाठी ही परवानगी असणार नाही लोकांनी दुकानांवर किंवा बाजारात जाताना
पायी किंवा सायकल वर जावं शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा अत्यावश्यक असलेल्या
वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल किंवा यासाठी वाहनही वापरता येणार नाहीत
एखाद्या बाजारपेठेत एकमेकांपासून अंतर राखण्याचा नियमांचा अवलंब केला जात नसेल तर सदर
बाजार पैसे तात्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत रिक्षा,टॅक्सी
येत्या शुक्रवारपासून सुरू करण्यात येतील एक चालक अन्य दोन प्रवाशांना यातून प्रवास
करण्याची परवानगी असेल सर्व चारचाकी वाहनासाठी हाच नियम राहील मात्र दुचाकीवरून फक्त
एकच जण जाऊ शकेल
मिशन बिगीन अगेनचा तिसरा
टप्पा 8 जून पासून सुरू होईल या खासगी कार्यालयात 10% कर्मचाऱ्यांसह सुरू करता येतील
इतर कर्मचाऱ्यांना घरून काम करावं लागणार आहे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आपल्या मार्गदर्शक
तत्त्वात 8 जून पासून धार्मिक तसेच प्रार्थनास्थळ, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी
दिली असती तरी राज्य सरकारने मात्र यावर बंदी कायम ठेवली आहे याशिवाय शाळा, महाविद्यालय,
प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासही बंदच राहणार आहेत आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो
रेल्वे, चित्रपटगृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन नाट्यगृह, प्रेक्षागृह, मंगल
कार्यालय बंद राहतील सामूहिक पद्धतीने साजरे होणारे सामाजिक, राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक,
धार्मिक कार्यक्रमांनी बंदच राहणार आहेत याशिवाय केशकर्तनालय, ब्युटी पार्लर,
स्पा सेंटरही 30 जून पर्यंत
बंद राहणार आहेत आंतर जिल्ह्यांमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा बंद राहील मात्र
जिल्हांतर्गत समतेच्या 50% प्रवाशांसह ती सुरू राहील यापूर्वी राज्य सरकारने जाहीर
केलेल्या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत सर्वांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड
करण्याचा सल्लाही सरकारने आपल्या कार्य जारी केलेल्या नियमावलीला आहे
****
राज्यात
पदवी, पदविका, पदव्युत्तर विषयांच्या अंतिम सत्राच्या परिक्षा तुर्तास रद्द करण्यात
आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते काल सामाजिक संपर्क माध्यमावरुन
जनतेशी संवाद साधत होते. विद्यार्थ्यांना यापूर्वीच्या सेमिस्टरमधल्या गुणांच्या आधारे
सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येईल, असं ते म्हणाले. याविषयी अधिक माहिती देताना
ते म्हणाले,
शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ
द्यायचा नाही या मुलाने अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ
आता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून आपण
ठरविलेले आहे या विद्यार्थ्यांना
जेवढे सेमिस्टर झाले त्याची सरासरी करुन मार्क देऊन पास करायचं आणि
जर पास केल्यानंतर जर कोणाला असं वाटत असेल तर परीक्षा झाली असती तर मी आणखीन चांगले
मार्क मिळवू शकलो असतो ज्यांना – त्यांना परीक्षेला बसून अधिक मार्क मिळवण्याची त्यांची
इच्छा असेल त्यांची परीक्षा घेण्याचे तयारी ठेवतो आहोत म्हणजे आपण त्यांना टेन्शन मधून मोकळं करत आहोत
विद्यार्थ्यांचं
नुकसान टाळण्यासाठी शाळा सुरु करण्यापेक्षा शिक्षण सुरु करण्यावर भर देत असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले. कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या दुर्गम भागातल्या ज्या
शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही, त्या शाळा सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचा नियम
पळून उघडता येतील, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागातल्या शाळांमध्ये ऑनलाईन
शिक्षण पद्धतीचा वापर करता येईल, असं ते म्हणाले. यासंदर्भात विशेषत: ग्रामीण भागातल्या
शाळा सुरु करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
पावसाळी
आपत्तीसाठी राज्य पूर्णपणे सज्ज असल्याचं ते म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गावर मात
करण्यासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली.
****
कोरोना
विषाणूग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर आणि परिचारिकांना मानधन तत्वावर
सेवेत घेण्यात यावं, असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.
त्यानुसार ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या निरोगी आणि अंतर्वासिता पूर्ण केलेल्या नोंदणीकृत
डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना
दरमहा ८० हजार रुपये मानधन दिलं जाईल. तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा
दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मुंबईतली
परिचारिकांची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात
येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल दिवसभरात दोन हजार ४८७ नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यामुळे राज्यातल्या
एकूण रूग्णांची संख्या ६७ हजार ६५५ एवढी झाली आहे. दिवसभरात उपचारादरम्यान ८९ रूग्ण
मरण पावले. त्यामुळे या आजारानं राज्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या आता दोन हजार २८६
एवढी झाली आहे. काल दिवसभरात एकूण एक हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
मुंबईत
एक हजार २४४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या ३८ हजार ४६४ झाली
आहे. काल दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईतल्या मृतांची एकूण संख्या
एक हजार २७९ एवढी झाली आहे. काल ४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल आणखी ४५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातली
एकूण रुग्णसंख्या एक हजार ५४३ झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये जुना मोंढ्यातलं
भवानी नगरमध्ये चार, कैलास नगर गल्ली क्रमांक दोन, सिडको एन सहा, किराडपुरा इथं प्रत्येकी
तीन, जुना बाजार, मनजित नगर इथं प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत. जाफर गेट, संजय नगर,
जसवंतपुरा, व्यंकटेश नगर, समता नगर, नवीन बायजीपुरा, अहिंसा नगर, पिसादेवी रोड, बजाज
नगर, देवळाई परिसर, नाथ नगर, बालाजी नगर, हमालवाडी,
भोईवाडा, सुराणा नगर, आझम कॉलनी, सादात नगर, महेमुदपुरा, निझामगंज कॉलनी, शहागंज, बीड
बायपास रोड, स्वप्न नगरी, चंपा चौक, शताब्दी नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
अन्य भागातले तीन रुग्ण आहेत.
दरम्यान,
औरंगाबादमध्ये काल तीन बाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये निजामगंज कॉलनीतली ५२ वर्षीय
तर किराडपुरा भागातल्या ६२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. शनिवारी रूग्णालयात दाखल करण्यात
आलेल्या जुना बाजारमधल्या ७५ वर्षीय पुरुषाचाही काल मृत्यू झाला. या आजारानं औरंगाबादमध्ये
एकूण मृतांची संख्या ही ७२ झाली आहे.
काल
औरंगाबाद मध्ये १२ कोरोना विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत
एक हजार २९ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. सध्या ४४२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्यात काल पुन्हा आठ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात
एकूण बाधित रूग्णांची संख्या १८० झाली आहे. यामध्ये वसमत, गिरगाव, कौठा, कुरूंदवाडी
इथला प्रत्येकी एक जण तर हयातनगर आणि पहेणीचे प्रत्येकी दोघे जण आहेत. सध्या ७५ रूग्णांवर
उपचार सुरू असून आतापर्यंत १०५ जण बरे होऊन घरी गेले आहेत.
****
जालना
जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातल्या
रूग्णांची संख्या १२७ झाली आहे. अंबड तालुक्यातल्या मठ पिंपळगाव आणि जालना तालुक्यातल्या
गोलवाडी इथल्या प्रत्येकी एका महिलेचा आणि गोलापांगरी इथल्या एका अंगणवाडी सेविकेचा
यात समावेश आहे. परतूर तालुक्यातल्या मापेगाव इथल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यूनंतरचा
अहवाल बाधित असल्याचा आला आहे.
जालना
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातही काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले. दोन्ही रूग्ण मुखेड
तालुक्यातल्या भेंडेगाव इथले असून, ते मुंबईहून नुकतेच परतले आहेत. आता जिल्ह्यात एकूण
कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. आजपर्यंत १०३ रूग्ण बरे होऊन घरी
परतले आहेत, तर ३५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
परभणी
शहरात काल आणखी दोन जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. मातोश्री नगर आणि त्रिमूर्ती
नगर इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ८२ झाली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल आणखी दोन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. सुंभा आणि नळदुर्ग
इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळाला. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७३ झाली आहे.
****
बीड
जिल्ह्यात काल १४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांना बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. जिल्ह्यात आतापर्यंत २९ जण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या २७ रुग्णांवर उपचार
सुरु आहेत.
****
कोविड
१९ च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात ते काल देशवासियांशी
संवाद साधत होते. कोविड १९ ची महामारी आणि टाळेबंदीच्या काळातले अनुभव देशाला स्वावलंबाच्या
वाटेवर पुढे जायला उपयुक्त ठरतील असं सांगून पंतप्रधानांनी अनेक प्रेरणादायी उदाहरणांचा
उल्लेख केला. यामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा इथल्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्यानं
तयार केलेल्या सॅनिटायझर फवारणी यंत्राचंही पंतप्रधान मोदी यांनी कौतुक केलं. आपल्या
संशोधनाबद्दल माहिती देतांना जाधव म्हणाले....
कोरोनावर मात आपण एखाद्या
मशीन करावा असं माझ्या डोक्यात मशीन बनवण्याचे माझ्या डोक्यात कल्पना आली तर हे आणि
मशीन सॅनिटायझरींग करण्यासाठी बनवले त्याच्यामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या त्याच्यावरती
आणि बरच मटेरयिल जमा करून साहित्य आणून हे तयार केलेले मशीन आहेत लोकं रस्त्याने ये-जा
करतात काही कोरोनाबाधित लोकांचे जे काही वाहनांना किंवा दरवाजांना जाता-येताना जो संसर्ग
होतो त्याच्यासाठी हे कोरोनाचे जंतू नष्ट होण्यासाठी ह्या मशीन चा उपयोग होऊ शकतो
सध्याच्या
कोरोना विषाणूच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं केलेल्या काही उपाययोजनांची माहितीही
पंतप्रधानांनी यावेळी दिली.
पाणी
ही आपली जबाबदारी असून, येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी
जिरवलं पाहिजे, असं आवाहन करत पंतप्रधानांनी, येत्या पाच जून रोजी 'पर्यावरण दिना'निमित्त
प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत, तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी
पाण्याची व्यवस्था करावी असं सांगितलं.
****
परभणी
महानगरपालिकेनं ३१ मे पर्यंतचा थकीत मालमत्ता आणि पाणीपट्टी कर एकरकमी भरणा केल्यास,
मालमत्ता कराच्या विलंब शास्तीवर ५० टक्के तर पाणीपट्टी कराच्या विलंब शास्तीवर शंभर
टक्के सूट देण्याची मुदत ३० जून पर्यंत वाढवली आहे. याआधी ही मुदत ३१ मे पर्यंत होती.
****
रुग्णांची
वाढती संख्या लक्षात घेता हिंगोली जिल्ह्यातही कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा सुरू
करण्यात यावी अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी केली आहे. जिल्ह्यात रुग्णांचा आकडा
लक्षणीय असून इथल्या रुग्णांचे तपासणीचे नमुने औरंगाबाद किंवा नांदेडला पाठवावे लागतात.
त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत असल्यानं हिंगोलीत प्रयोगशाळा सुरू व्हावी,
अशा मागणीचं पत्र सातव यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पाठवलं आहे.
****
हिंदी
चित्रपट सृष्टीतले नव्या दमाचे संगितकार, गायक वाजिद खान यांचं आज पहाटे मुंबईत निधन
आलं. ते ४२ वर्षांचे होते. किडनीशी संबंधित जंतु संसर्गामुळे प्रकृतीत बिघाड झाल्यानं,
त्यांना सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा
आज पहाटे त्यांचा मृत्य झाला. त्यांनी साजिद खान यांच्यासोबत साजिद-वाजिद या नावानं
अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेल्या दबंग, वाँटेड, एक था टायगर अशा चित्रपटांना त्यांनी
संगीत दिलं होतं.
****
राज्यात
काल बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन झालं. रोहिणी नक्षत्रावरच्या हा पाऊस
होता. मराठवाड्यात औरंगाबाद, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद, जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह
जोरदार पाऊस झाला तर, जालना, बीड, परभणी आणि लातूर जिल्ह्यातही दमदार पावसाची नोंद
झाली. या पावसामध्ये वीज अंगावर पडून दोन जणाचा मृत्यू झाला.
औरंगाबाद
शहरात काल रात्री दहा वाजेच्या सुमारास चांगला पाऊस झाला. सिल्लोड तालुक्याच्या अनेक
भागात तसंच फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथंही काल दुपारी वादळी वारा, मेघ गर्जनेसह
पाऊस झाला.
जालना
जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या राजूर, परिसरात सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह
पाऊस झाला. टेंभुर्णीसह चंदनझीरा इथंही पाऊस झाला. काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली.
जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यात आळंद इथं शेतात काम करत असणाऱ्या एका युवकावर वीज
पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. भोकरदान तालुक्यात खामखेडा इथं वीज पडून एक दुचाकी खाक
झाली. जालना तालुक्यात पळसखेडा ठोबरे इथं घरावरील पत्रं उडाल्यानं नऊ जण जखमी झाले.
बीड
शहरासह धारुर, केज, परळी, अंबाजोगाई आणि माजलगाव तालुक्यात संध्याकाळी पाऊस झाला.
परभणी
जिल्ह्यात पाथरी, गंगाखेडसह जिंतूर, पालम, मानवत, सेलू तालुक्यात काही ठिकाणी तुरळक
तर काही भागात संध्याकाळी वादळी पाऊस पडला. मानवत तालुक्यात कोल्हावाडी तर, बोरी इथं घरावरील पत्रं, शेतातले
शेड, विद्युत वितरणाचे खांब यांचं नुकसान झालं.
हिंगोली
जिल्ह्यात काल संध्याकाळी सहाच्या सुमारास सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह
पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पावसामुळं बऱ्याच ठिकाणाचा विद्युत पुरवठाही
खंडीत झाला होता. शिरडशहापूर इथं एका नारळाच्या झाडावर वीज पडल्यानं त्यानं पेट घेतला.
सेनगाव तालुक्यात हाताळा, आजेगा परिसरात वाऱ्यामुळं अनेक घरांवरील पत्रं उडाली. औंढा,
केंद्रा बुद्रुक, कहाकर, ताकतोडा, वलाना, नरसी नामदेव, येहळेगाव सोळंके या भागातही
पाऊस झाला.
नांदेड
शहरात हलका ते मध्यम तसंच कंधारसह लोहा इथंही चांगला पाऊस पडला.
लातूर
जिल्ह्यात लातूरसह, निलंगा आणि औसा शिरुर तालुक्यात रिमझीम पाऊस झाला.
उस्मानाबाद
जिल्ह्यात विविध ठिकाणी कमी -अधिक प्रमाणात
पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात येडशी इथं वाऱ्यामुळं अनेक घरांसह दुकानावरील पत्रं
उडाली. अनेक ठिकाणी विजांच्या तारा तुटून विज पुरवठा खंडीत झाला. भूम तालुक्याच्या
काही भागातही काल जोरदार पाऊस झाला.
लातूर
तालुक्यात चिकलठाणा इथं शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यानं ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारापूर्वीच
तिचा मृत्यु झाला.
सध्या
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण
होत असल्यानं परवा तीन जूनपर्यंत महाराष्ट्रासह
गुजरात किनारपट्टीवर वादळ धडकणार असल्याचं हवामान विभागानं सूचित केलं आहे. याच्या
परिणामस्वरुप पुढचे दोन दिवस मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यतेचा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या
हवामान विभागानही वर्तवला आहे.
***
हिंगोली
जिल्ह्यात हिंगोली आणि वसमत इथं काल पोलिस दलातले अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
घेण्यात आलं. या शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, थर्मल गनच्या साह्याने तापाची तपासणी, ऑक्सिजन पातळी,
रक्तदाब, अस्थीरोग, त्वचारोग अशा रोगासंबंधी तपासण्या तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या.
पोलीस मुख्यालयाचे ४८ अधिकारी आणि ८४१ कर्मचाऱ्यांची यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यात
आली.
****
लातूर
जिल्ह्यातल्या उदगीर ते रावनकोळा या नांदेड जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्याच्या
कामाचा प्रारंभ राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते काल झाला. केंद्रीय रस्ता निधीतून
होत असलेल्या या १८ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामावर ६ कोटी रुपये खर्च होणार आहेत.
****
बीड
शहरातले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व्यापारी आणि बालाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष,
हिरालाल सारडा यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं ते ८५ वर्षांचे होते. नगरसेवक, मंत्री
बँक, हिरालाल चौक व्यापारी महासंघ, राजस्थानी सेवा समाजाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं
होतं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी १० वाजता बीड शहरातल्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
केले जाणार आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची
आरोग्य तपासणी करताना शरीरातलं तापमान मोजण्या सोबतच ऑक्सीमीटरद्वारे तपासणी
व्हावी, तसंच आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी, कोरोना कक्षात
काम करणारे कर्मचारी, यांना आर्सेनिक अल्बम थर्टीचं वाटप केलं जावं असा आदेश उस्मानाबाद
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी आरोग्य विभागाला दिला आहे. कांबळे
यांनी काल उस्मानाबाद तालुक्यातल्या सुंबा या गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वतीनं मास्क, तसंच सॅनिटायझरचं वाटप करण्यात
आलं.
****
अखिल
भारतीय ब्राह्मण महासंघाची नायगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी
सुनिता कुळकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी तिलोत्तमा नायगावकर
तर कोषाध्यक्षपदी रोहिणी जोशी यांची निवड झाली आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात तुळजापूर इथं कृषी विज्ञान केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि रिलायन्स
फाउंडेशनच्या वतीनं महिला शेतकऱ्यांसाठी ऑडिओ कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलं होतं.
घरगुती बियाणं वापरत असताना करावयाची बीजप्रक्रिया, एकरी वापरावं लागणारं बियाणे, बियाण्यांची
उगवण क्षमता यावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment