आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ मे २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद शहरात आणखी ५७ जणांना
कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं आज स्पष्ट झालं आहे. ५७ रुग्णांची वाढ झाल्यानं औरंगाबाद
जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या नऊशे अठठावन्न झाल्याचं जिल्हा प्रशासनानं
कळवलं आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या
वैद्यकीय अहवालानुसार, शहरातल्या जालान नगर इथं १, उल्कानगरी १, रोहिदास हाऊसिंग सोसायटी
१, संजय नगर १, सातारा परिसर १, गणपती बाग - सातारा परिसर १, विद्यानगर - सेव्हन हिल्स
१ , एन-सहा - सिडको १, पुंडलिक नगर १, हुसेन कॉलनी ८, राम नगर ३, बहादूरपुरा ८, बारी
कॉलनी १, कबाडीपुरा, बुढीलेन ३, शरीफ कॉलनी ३, बाबर कॉलनी ३, सिंधी कॉलनी १, न्याय
नगर १, न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी १, सिल्क मिल कॉलनी १, घाटी १, रेंगटीपुरा इथं १, तर कन्नड तालुक्यातल्या
देवळाणा परिसरात २ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
दरम्यान, शासकीय रुग्णालय
- घाटीत गेल्या चौदा तासांमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे
आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या २९ झाल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे. या मृतांमध्ये
दोन महिला आणि एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
***
बीड जिल्ह्यात काल दोन कोरोना
बाधित रूग्ण आढळल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनानं तात्काळ उपाय योजना करत बीड, गेवराई
आणि माजलगाव तालुक्यात काही गावं प्रतिबंधित क्षेत्र, तर काही गावं बफर क्षेत्र म्हणून
घोषित केली आहेत. ही सर्व गावं आणि परिसर अनिश्चित काळासाठी पूर्णवेळ बंद करण्यात आला
असून, संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
***
बुलडाणा जिल्ह्यामध्ये २
नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये खामगाव शहरातील ६५ वर्षीय महिला, तर शेगाव
शहरातील एका सफाई कर्मचार्याचा समावेश आहे. आतापर्यंत बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची
संख्या २८ झाली आहे. तर जिल्ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
***
No comments:
Post a Comment