Monday, 22 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 22 JUNE 2020 TIME - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
पेट्रोल आणि डिझेलचे दर आज सलग सोळाव्या दिवशी महागले आहेत. पेट्रोलच्या दरामधे लीटरमागे ३३ पैसे तर डिझेलच्या दरामधे लीटरमागे ५८ पैशांनी वाढ झाली आहे. आजच्या या दरवाढीनंतर गेल्या सोळा दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे ८ रुपये ३० पैसे, तर डिझेलच्या किमतीत लिटरमागे ९ रुपये ४६ पैसे वाढ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाविषाणू बाधितांची संख्या ३ हजार ६३२ झाली आहे. यापैकी १ हजार ९६८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १ हजार ४७३  रुग्णांवर उपचार सुरू असून १९१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे. आज सकाळी आढळलेल्या नवीन १०२ रुग्णांमध्ये दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर, भाग्य नगर इथं प्रत्येकी ५, पळशी , शिवाजी नगर- गंगापूर, राजे संभाजी कॉलनी, नवजीवन कॉलनी हडको- एन अकरा, टीव्ही सेंटर इथं प्रत्येकी ४ ,वाळूज, गजानन नगर, मयूर नगर, मिटमिटा, गारखेडा परिसर, शिवाजी कॉलनी- मुकुंवाडी, जागृत हनुमान मंदिराजवळ तसंच बजाज नगर, फुले नगरी, पंढरपूर, करमाड इथं प्रत्येकी ३ , शिवाजी कॉलनी- मुकुंदवाडी, एन अकरा- सिडको , सारा वैभव- जटवाडा रोड, जाधववाडी, बजाज नगर- वाळूज, नागेश्वरवाडी, एन अकरा, जय भवानी चौक- बजाज नगर, मांडकी इथं प्रत्येकी २, बारी कॉलनी, गजगाव- गंगापूर, न्याय नगर- गारखेडा परिसर, सुरेवाडी , एन सहा-संभाजी पार्क, उस्मानपुरा, आंबेडकर नगर- एन सात, भारत नगर- एन बारा- हडको, उल्का नगरी- गारखेडा, नॅशनल कॉलनी, संभाजी कॉलनी , आनंद नगर, अयोध्या नगर-सिडको, संत ज्ञानेश्वर नगर, मुकुंदवाडी, न्यू पहाडसिंगपुरा- जगदीश नगर , काल्डा कॉर्नर , एन सहा- मथुरा नगर, सुदर्शन नगर, महादेव मंदिर परिसर- बजाज नगर,  शिवशंभो हाऊसिंग सोसायटी-बजाज नगर, स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी-बजाज नगर, पंचमुखी महादेव मंदिराजवळ, भवानी नगर, गंगापूर इथं प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.
****
जालना जिल्ह्यात आज १७ कोरोनाविषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३७८ झाली आहे. आतापर्यंत ११ जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये टेंभूर्णी इथं ९, मंगल बाजार, वाल्मिक नगर इथं प्रत्येकी २, अबंड, हाकिम मोहल्ला, नाथ बाबा गल्ली आणि राज्य राखीव पोलिस दलातील १ रुग्णांचा समावेश आहे.
****
कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात यावं या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आजपासून राज्यभर आंदोलन करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर इथं शेतकऱ्यांनी बँकांसमोर गर्दी केली आहे. पीक कर्ज देण्याच्सा मागणीसाठी शेतकरी मोठ्या संख्येनं बँकांसमोर जमा झाले असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सौंदाळा इथं ९ वर्षीय मुलीचा काल संशयास्पद मृत्यू झाला. या मुलीच्या पायावर जखमा दिसल्या असून शरीर काळे पडल्यानं सर्पदंश झाला असेल असे समजून तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी सदर मुलीला मृत घोषित केले. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत ५० लाचखोर अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले आहे. अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, आणि वाशिम जिल्ह्यात एकूण ३६ ठिकाणी केलेल्या कारवायांमधे ५० लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या अटक केलेल्या लाचखोरी प्रकरणात वर्ग एक, वर्ग २,वर्ग ३ तसंच  चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते महसूल, पोलीस, वन विभाग, समाज कल्याण, जिल्हा परिषद ,राज्य परिवहन या विभागातले आहेत.
****
केंद्र सरकारने किमान हमीभाव योजनेअंतर्गत देशभरातल्या सोळा राज्यांतून ७९ कोटी ४२ लाख रुपये किमतीची वन उत्पादनं खरेदी केली आहेत. चालू वर्षांत सरकारी तसंच खासगी माध्यमातून खरेदी झालेल्या वन उत्पादनांचं एकूण मूल्य दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं आहे. कोविड प्रादुर्भावाच्या काळात आदिवसी नागरिकांसाठी हा उत्पन्नाचा चांगला मार्ग ठरला आहे.
दरम्यान, केंद्र सरकारनं आज ईशान्य भारतातल्या काही राज्यांसाठी आरोग्याविषयक सुविधांकरता १९० कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात टाळेबंदीतून वगळण्यात आलेल्या सर्व आस्थापना आजपासून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश प्रशासनाच्यावतीनं जारी करण्यात आले आहेत.
****


No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 15 اگست 2025‘ وقت: صبح 06:50 تا 07:00

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 15 August-2025 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبری...