Thursday, 22 October 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.10.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ६८ लाख ७४ हजार ५१८ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८९ पूर्णांक २० शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

देशात दर दहा लाख व्यक्तींमागे कोरोना विषाणू ग्रस्ताचं प्रमाण हे इतर देशांच्या तूलनेत अत्यंत कमी आहे. मृत्यूदरही सातत्यानं कमी होत असून सध्या तो एक पूर्णांक एकावन्न शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालायनं दिली आहे. 

****

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचे काल दिवसभरात आणखी आठ हजार १४२ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १६ लाख १७ हजार ६५८ झाली आहे. राज्यभरात काल १८० रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला.

****

मराठवाड्यात कोरोना विषाणू संसर्गामुळे काल १७ रुग्णांचा मृत्यू झाला, तर नव्या ५८३ रुग्णांची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात या संसर्गामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर आणखी ८३ रुग्ण आढळले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणू संसर्गाचे ३७ हजार दोन रुग्ण आढळले आहेत. सध्या एक हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु असून जिल्ह्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ४३ झाली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे बीड जिल्ह्यात दरवर्षी साजरा होणारा दसरा मेळावा यावर्षी सर्वांनी आपापल्या घरी राहूनच साजरा करावा असं आवाहन संयोजक माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या वर्षीचा दसरा मेळावा हा दरवर्षी प्रमाने होणार नसून यंदा हा मेळावा सामाजिक माध्यामांद्वारे होणार असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या सिटी चौक पोलीस ठाण्यातला फौजदार संतोष पाटे याला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून अटक न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.

****

औरंगाबाद जिल्ह्यात नाशिक महामार्गवर असलेल्या वरझडी शिवार इथं काल सिमेंट मिश्रणाचा ट्रक आणि शीतपेयाची वाहतूक करणाऱ्या गाडीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यांची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली आहे.

****

No comments: