आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१८ नोव्हेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
देशात गेल्या २४ तासात कोविड
संसर्ग झालेले नवे ३८ हजार ६१७ रुग्ण आढळले, त्यामुळ देशातली एकूण कोविडबाधितांची संख्या
८९ लाख १२ हजार ९०८ झाली आहे. गेल्या २४ तासांत ४७४ रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू
झाला, तर ४४ हजार ७३९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले आहेत. सध्या देशात ४ लाख ४६ हजार
८०५ सक्रीय रुग्ण असल्याचं, आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या बातमीत म्हटलं आहे.
****
मुंबईत
गेल्या चोवीस तासांत ५४१ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली तर १४ रुग्णांचा
मृत्यू झाला. काल दिवसभरात १ हजार ५६५ कोविड बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे
रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून सध्या ८ हजार ९४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आतापर्यंत ४१ हजार ७७६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ४०
हजारावर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर या आजारानं आतापर्यंत १ हजार १२० रुग्णांचा
मृत्यू झाला असुन सध्या ५८२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली
जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात हपसापूर इथं एका शेतातून गांजाची एकूण ३४५ झाडे हट्टा
पोलिसांनी जप्त केली आहेत. नामदेव सूर्यभान सवंडकर असं या शेतकऱ्याचं नाव असून या कारवाईत
पोलिसांनी २१ लाख ८७ हजार २०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
****
बृहन्मुंबई
महानगरपालिकेनं येत्या २० आणि २१ नोव्हेंबरला साजऱ्या होणाऱ्या छटपूजाविषयक कार्यक्रमांच्या
आयोजनावर प्रतिबंध घातला आहे. कृत्रिम तलावांत पूजेसाठी विभाग स्तरांवरील पोलिसांमार्फत
परवानगी घेण्याच्या सूचना उत्तर भारतीयांना देण्यात आल्या आहेत.
****
बीड
जिल्ह्यात अंबाजोगाई इथं २५ आणि २६ नोव्हेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन
करण्यात आलं आहे. या महोत्सवात यंदाचे यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार कृषी उद्योजक
चंद्रशेखर कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, गायिका सरोजिनी देशपांडे, आणि दिव्यांग
युवक योगेश खंदारे यांना प्रदान केले जाणार आहेत.
****////****
No comments:
Post a Comment