आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाला शेतकऱ्यांच्या बांधावर
नाममात्र शुल्कात वेळेत उपचार मिळावेत, यासाठी
राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात येत्या २०२२ पर्यंत फिरतं पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु
करणार असल्याचं पशुसंवर्धन, दुग्धविकास
व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी काल सांगितलं.
पहिल्या
टप्प्यात नागपूर विभागात फिरत्या १५ पशुवैद्यकीय
रुग्णालयांचा काल प्रारंभ करण्यात आला. त्या
प्रसंगी ते बोलत होते. फिरत्या पशुवैद्यकीय
रुग्णालयांमुळे पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे, असं
त्यांनी नमूद केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषिपूरक
व्यवसायावर अवलंबून आहे. त्यामुळे फिरते पशुवैद्यकीय रुग्णालये ही नितांत गरज असल्याचं
ते म्हणाले.
****
बीड जिल्ह्याच्या गेवराई इथं शेतपंपांचा विद्युत पुरवठा महावितरणनं खंडित केल्या
प्रकरणी काल सुरु करण्यात आलेलं उपोषण चर्चेनंतर माघे घेण्यात आलं. रब्बी हंगामातील
पिकं ऐन भरात असताना, वीजवितरण कंपनीनं पूर्व सूचना न देता शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा
खंडित केला. त्यामुळे गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार लक्ष्मण पवार यांच्यासह
काल दुपारी उपोषन सुरू केलं. मात्र महावितरणचे वरिष्ठ आधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये
सविस्तर बैठक होऊन एका आठवड्यात वीज बील भरल्यास आणि कुठलीही थकबाकी न ठेवल्यास वीज
तोडणी करु नये असं लेखी आश्वासन मिळाल्यानं उपोषण मागे घेण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यातले मोक्का अंतर्गत फरार असलेल्या पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक
गुन्हा शाखेनं काल अटक केली. अटक केलेल्या पाचही अट्टल गुन्हेगारांविरूद्ध जालना, औरंगाबाद,
बीड, परभणी इथं दरोडे, चोरी, खून, लुटमार यासारखे
गंभीर अकरा गुन्हे दाखल आहेत. गुन्हा करून हे गुन्हेगार मागील आठ- दहा वर्षांपासून
फरार होते. विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी बीड विशेष मोहीम राबवून
ही कारवाई केली.
****
चेन्नई इथं भारत - इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दूसऱ्या दिवशी
भारताचा पहिला डाव सर्वबाद ३२९ धावांवर संपुष्टात आला असून इंग्लंडच्या पहिल्या डावात
दोन बाद १६ धावा झाल्या आहेत.
***///***
No comments:
Post a Comment