Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14
February 2021
Time 7.10 AM
to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ फेब्रुवारी २०२१ सकाळी ७.१०
मि.
****
** केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था
येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना
विश्वास
** वाहतूक कोंडी टाळण्यासाठी औरंगाबाद-पुणे महामार्ग सहापदरी करण्याची केंद्रीय मंत्री नितीन
गडकरी यांची घोषणा
** औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच लोकसहभागाच्या
माध्यमातून शहराचं
सुशोभिकरण करण्याची नगर विकास मंत्री एकनाथ
शिंदे यांची सूचना
** राज्यात तीन हजार ६११ नव्या कोविड रुग्णांची नोंद, मराठवाड्यात आठ बाधितांचा
मृत्यु
** नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन
अध्यासन केंद्र सुरु होणार
आणि
** इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या
डावात भारताच्या ६ बाद ३०० धावा
****
अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचं कामकाज काल स्थगित झालं. आठ मार्चपासून
अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला सुरवात होईल.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत काल केंद्रीय अर्थसंकल्पावरच्या चर्चेला उत्तर
दिलं. केंद्र सरकारनं केलेल्या
सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था
येत्या काही दिवसात जगात सगळ्यात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सरकारनं आव्हानांचं संधीत
रुपांतर केलं असून, यंदाचा
अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर बनवणारा अर्थसंकल्प असल्याचं त्या म्हणाल्या.
सरकारनं अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुदींमध्ये कपात केल्याचा विरोधकांचा आरोप, अर्थमंत्र्यांनी फेटाळून लावला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत
दहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना एक लाख १५ हजार कोटी रुपये निधी वितरीत करण्यात
आल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण क्षेत्रातल्या निधीतही यावर्षी १९ टक्क्यांनी
वाढ करण्यात आल्याची माहिती सीतारामन यांनी दिली.
****
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी काल लोकसभेत शून्यकाळात हमाल माथाडी
कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या मुद्याकडे लक्ष वेधलं. या कामगारांच्या
मजुरीतून माथाडी मंडळ ३० टक्के रक्कम कापून घेतं, त्यामध्ये भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करण्याच्या १२ टक्के रकमेचाही समावेश
असतो, पण ही रक्कम भविष्य निर्वाह
निधीमध्ये जमा न करता, मंडळांच्या
खासगी बँक खात्यात पडून असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला. कामगार मंत्रालयानं
या प्रकरणी लक्ष घालून ही रक्कम कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीमध्ये वर्ग करावी, अशी मागणी खासदार जलील यांनी केली.
बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी कोविड काळात खासदार निधी निलंबित
ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला. खासदारांना स्थानिक विकास निधी अंतर्गत विकास
कामांसाठी काही प्रमाणात खर्च करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डॉ मुंडे यांनी केली.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती
मदत निधीमधून तात्काळ मदत करावी अशी मागणी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर
यांनी केली आहे. ते काल लोकसभेत शून्य प्रहारात बोलत होते. जिल्ह्यात सुमारे ६ लाख
४४ हजार शेतकऱ्यांना राज्य शासनाने ४५८ कोटी ६८ लाख रुपये मदत दिली आहे. परंतु
केंद्र सरकारकडून मदत मिळाली नसल्याकडे निंबाळकर यांनी लक्ष वेधलं.
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पेट्रोल डीझेलच्या वाढत्या किमतीकडे लक्ष
वेधलं. इंधनावरचं उत्पादन शुल्क कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी राऊत
यांनी केली.
नाशिकच्या खासदार भारती पवार यांनी कोविड काळातल्या कृषीपंपांच्या वीज बील
थकबाकीप्रकरणी गावांची वीज खंडीत केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला, ही कारवाई थांबवण्यात यावी, अशी मागणी खासदार पवार यांनी केली.
****
औरंगाबाद-पुणे महामार्गावरील वाढती वाहतूक आणि त्यातून होणारी कोंडी
टाळण्यासाठी हा रस्ता सहापदरी करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक
मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितलं. पुण्यात ते काल वार्ताहरांशी बोलत
होते. पुणे शहर- उपनगरातून बाहेर जाताना होणारा खोळंबा लक्षात घेता
पुणे-शिरुर ४७ किलोमीटरचा रस्ता डबल डेकर
बारा पदरी करण्याचं काम येत्या सहा महिन्यात सुरु करण्याचं निर्धारित असून
त्यानंतर औरंगाबादकडे येणारा रस्ता मोठा केला जाईल असं गडकरी यांनी नमूद केलं.
देहू-आळंदी ते पंढरपूरदरम्यान संत ज्ञानेश्वर -संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा
महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवला जात असल्याचं ते म्हणाले. मुंबई- पुणे महामार्गाला
सुरत इथून बाह्यवळण रस्ता काढून नाशिक- अहमदनगर-सोलापूर मार्गे दक्षिण भारताला
जोडण्यासाठी भूसंपादन सुरु असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, औरंगाबादसह जालना
जिल्ह्यातून जाणारा समृध्दी महामार्ग जालना मार्गे नांदेडला जोडण्यात येणार असून
यासाठी सध्या तपशीलवार प्रकल्प अहवाल-डी.पी.आर. तयार होत असल्याची माहिती राज्याचे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद इथं दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या
विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच लोकसहभागाच्या
माध्यमातून शहराचे सुशोभिकरण करुन घ्यावं, असं नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठकीत ते बोलत होते. शहरात अतिक्रमण
आणि अनधिकृत बांधकामे होणार नाहीत
यांची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. स्वच्छ आणि सुंदर शहर निर्माण
करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने गुणवत्तापूर्ण विकासकामे वेळेत
पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्ह्यातल्या नगर परिषदा आणि नगर पचायंतीच्या बैठकीत
शिंदे यांनी दिले.
****
शहरातील सातारा-देवळाई भागाच्या विकासासाठी सध्या पन्नास कोटी
रुपयांचा निधी मंजुर झाला असून ,या
भागाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचं नगरविकास मंत्री शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांच्या हस्ते काल औरंगाबाद शहरातील विविध ठिकाणच्या
विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील
बालाजी नगर इथं शिंदे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि रक्तदान शिबीराचं
उद्घाटनही करण्यात आलं.
****
नाशिक इथल्या भारतीय तोफखाना प्रशिक्षण केंद्रातून ३०२ नवसैनिकांची तुकडी काल
भारतीय सैन्यदलात दाखल झाली. तोपखाना केंद्राच्या उमराव मैदानावर सकाळी दिमाखदार
दीक्षांत सोहळा झाला. तोफखान्याचे कमांडंट ब्रिगेडियर जे.एस. गोराया यांनी पथ
संचलनाचं निरीक्षण करत नवसैनिकांचा गौरव केला. सैनिकांनी नेहमीच ‘सैनिक’ धर्म
पाळावा आणि भारतीय सेनेची उज्ज्वल परंपरा आणि इतिहास सदैव स्मरणात ठेवावा, असं आवाहन ब्रिगेडियर गोराया यांनी यावेळी केलं.
****
राज्यात काल तीन हजार ६११ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २० लाख
६० हजार १८६ झाली आहे. काल एक हजार ७७३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात
आतापर्यंत १९ लाख ७४ हजार २४८ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा
दर ९५ पूर्णांक ८३ शतांश टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यभरात ३३ हजार २६९
रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल आठ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. यात
बीड इथं पाच, औरंगाबाद दोन आणि परभणी
जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. तर, विभागात १९७ नव्या कोरोना
बाधित रुग्णांची नोंद झाली. औरंगाबाद जिल्ह्यात काल ५८ नवे रुग्ण आढळले. जालना
जिल्ह्यात सात, लातूर ४१, नांदेड ३२, बीड
२८, उस्मानाबाद सहा, परभणी १७, तर
हिंगोली जिल्ह्यात काल आठ नवे रुग्ण आढळून आले.
****
परभणी इथं काल ५ हजार ८९१ अधिकारी कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यात आली.
यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसह महसूल तसंच अन्य विभागातल्या कर्मचाऱ्यांचा समावेश
आहे.
लातूर इथं पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे तसंच अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत
जाधव यांनी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोविड लस घेतली. ही
लस सुरक्षित असून, सर्वांनी
लस टोचून घेण्याचं आवाहन निखील पिंगळे यांनी केलं. ते म्हणाले...
मी कोविडची लसं घेतली आणि मी अगदी बरा आहे. सर्वांना देखील माझं
हेच आवाहन राहील अत्यंत सुरक्षित लस आहे. आणि जशीजशी आपल्याला संधी मिळेल उपलब्धता
होईल. आपल्या सर्वांनी देखील कोरोनाच्या लसीचा फायदा लवकरात लवकर घ्यायचा आहे.धन्यवाद.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तीन अध्यासन केंद्र
सुरु करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आणि
शंकरराव चव्हाण यांच्या नावे असलेल्या या अध्यासन केंद्रांना ५० लाख रुपये निधी
मंजूर करण्यात आल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
ते काल नांदेड इथं विद्यापीठात विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्था आदी विविध घटकांना संबोधित
करीत होते. राज्यात सहा ठिकाणी प्रबोधनकार अभ्यास केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
यामध्ये नांदेड, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, पुणे आणि नागपूर या विद्यापीठांचा समावेश असल्याचं सामंत
यांनी सांगितलं. विद्यापीठ परिसरात गणितीयशास्त्र संकुलाच्या विस्तारित इमारतीचं
तसंच श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी आणि तंत्रशास्त्र संस्थेच्या यांत्रिकी
विभागातल्या औद्योगिक यंत्रमानव निर्मिती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन पालकमंत्री
अशोक चव्हाण आणि सामंत यांच्या उपस्थितीत काल करण्यात आलं.
****
‘माझी वसुंधरा’ प्रकल्पाअंतर्गत औरंगाबाद इथं सुरू असलेल्या खाम नदी पुनरुज्जीवन मोहिमेत काल
दुसऱ्या शनिवारी नागरिक उत्साहाने सहभागी झाले. सकाळी ७ ते १० या वेळेत राबवण्यात
आलेल्या या मोहिमेत नदी पात्रातून सुमारे पाच टन सुका कचरा उचलण्यात आला, तर नदीकिनारी ७०० झाडे लावण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कोराळी या गावातून आमदार अभिमन्यू पवार
यांनी आमदार आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात केली. शेवटच्या माणसापर्यंत विकास
पोहोचला पाहिजे हा उद्देश ठेवून, राज्यातल्या
शेवटच्या गावातून ही योजना राबवत असल्याचं आमदार पवार यांनी सांगितलं. यासाठी
सर्कल निहाय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिबीराचं आयोजन करून, सरकारी योजनांशी निगडित अडचणी सोडवल्या जातील, असं पवार यांनी सांगितलं.
****
मंगला विंचुर्णे- बर्दापूरकर स्मृती पारितोषिक काल
औरंगाबादच्या महात्मा गांधी मिशन- एम.जी.एम. संस्थेच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या बी.ए.
अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या राखी तांबट हिला प्रदान करण्यात आलं. या पारितोषिक वितरणाचं हे पहिलच वर्ष असून या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार राजीव
खांडेकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले, एम.जी.एम. विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद ३०० धावा झाल्या. काल भारतानं नाणेफेक
जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहीत शर्मानं शानदार शतक
झळकावलं. रोहित १६१ धावांवर बाद झाला, अजिंक्य राहणे ६७, चेतेश्वर
पुजारा २१, आणि रविचंद्रन अश्विन १३
धावांवर तर शुभमन गील आणि कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाले. काल पहिल्या
दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा
अक्षर पटेल ५ तर ऋषभ पंत ३३ धावांवर खेळत होते.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा नदीपात्रातून वाळूचं अवैध उत्खनन करून चोरटी विक्री
करण्यासाठी निघालेला टिप्पर पूर्णा पोलिसांनी काल सकाळी जप्त केला. या मोहिमेत चार
लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पूर्णा पोलिस
ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
****
परभणी महानगर पालिकेनं मालमत्ता कर तसंच पाणीपट्टीच्या थकबाकीवरच्या
दंडात शंभर टक्के सूट जाहीर केली आहे.
नागरिकांनी या महिनाअखेरपर्यंत मालमत्ता कर, नळपट्टी, भरून या सवलतीचा लाभ घ्यावा, असं आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केलं आहे.
****
राज्यातली कृषी पर्यटन केंद्रं तसंच ग्रामीण पर्यटन केंद्रांची राज्याच्या
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी करणं आवश्यक असल्याचं, पर्यटन तज्ञ तसंच पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे यांनी म्हटलं आहे. यशवंतराव
चव्हाण प्रतिष्ठानचं विभागीय केंद्र, महात्मा गांधी मिशन आणि औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त
विद्यमानं काल औरंगाबाद इथं घेण्यात आलेल्या पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत
होते. या केंद्रांची पर्यटन संचालनालयाकडे नोंदणी झाल्यास, पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होऊ शकतील, तसंच सर्व कृषी आणि ग्रामीण पर्यटन केंद्रांचं एक नेटवर्क तयार होईल, असं मत हाडवळे यांनी व्यक्त केलं.
पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हरकर यांनी यावेळी बोलताना, राज्याचा पर्यटन विभाग राबवत असलेल्या विविध उपक्रमांमध्ये
या क्षेत्रातल्या लाभार्थी घटकांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन केलं.
****
राज्यातल्या हस्तकला आणि हातमाग कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना आता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याची दारं खुली झाली आहेत. महाराष्ट्र लघुउद्योग
विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य खादी-ग्रामोद्योग मंडळ यांनी फ्लिपकार्ट सोबत
नुकताच याबाबत करार केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात
झालेल्या या सामंजस्य करारानुसार आता पैठणी साडी, हिमरु शाली अशा वेगवेगळ्या वस्तूंची जागतिक पातळीवर विक्री करता येईल. हस्तकला
आणि हातमाग कारागिरांनी त्यांच्या वस्तु, या ऑनलाईन विक्री व्यासपीठावर विक्रीसाठी ठेवल्या तर पहिल्या सहा
महिन्यापर्यंत, फ्लिपकार्ट कडून कोणतही
कमिशन आकारण्यात येणार नाही.
***///***
No comments:
Post a Comment