Sunday, 14 February 2021

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 February 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 February 2021

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १फेब्रुवारी २०२१ दुपारी १.०० वा.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चेन्नई इथं युद्धादरम्यान वापरासाठीच्या सुसज्ज अशा अर्जुन- एम.के.- वन ए हा रणगाडा सशस्त्र सेना दलाकडे सुर्पूद केला. पंतप्रधान मोजी आज तामिळनाडूच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध विकास कामांचा शुभारंभ होणार असून यात चेन्नई मेट्रो रेल्वे टप्पा एक, रेल्वे विद्युतीकरण, नविन रेल्वे मार्ग, जलसंधारणासाठीच्या महत्वपूर्ण प्रकल्पांचा समावेश आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंध्र प्रदेशात कर्नूल जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. दुःखाच्या या क्षणी आपण मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस-ट्रक यांच्यात हा आज पहाटे चार वाजेच्या सुमारास जिल्ह्यामदारपूर गावाजवळ ही घटना घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. बसमधील सर्वजण राजस्थानातील अजमेरला जात होते.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

देशातल्या आरोग्य सेवकांना कालपासून कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. १६ जानेवारीला ज्यांना पहिली मात्रा देण्यात आली होती, त्यांना काल दुसरी मात्रा देण्यात आली. या लसीची दुसरी मात्रा २८ दिवसांच्या अंतरानं दिली जाते.  काल एका दिवसात ३५ राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून चार लाख, ६२ हजार, ६३७ जणांना लस दिल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत देशभरात ८० लाख, ५२ हजार लोकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

दरम्यान, राज्यात काल संध्याकापर्यंत ६९२ लसीकरण केंद्रामधून एकूण ३१ हजार ९७६ लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. आतापर्यंत लसीकरण करण्यात आलेल्यांची संख्या ६ लाख ८३ हजार चार इतकी झाली आहे.

३१ हजार ८२८ लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड तर १४८ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

चालू खरीप हंगामात केंद्र सरकारनं केलेल्या शेतमाल खरेदीतून किमान एक लाख, वीस हजार कोटी रुपयांच्या आधारभूत किंमतीचा ९१ लाखांहून अधिक धान्य उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्र सरकार सध्या अस्तित्त्वात असलेल्या किमान विक्री मूल्य- एम. एस. पी. योजनांच्या माध्यमातून किमान आधारभूत किंमतीत दरानं शेतकऱ्यांकडून खरीप पिकांची खरेदी करत असल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, तमिनाडू, चंदीड, जम्मू-कश्मीरसह एकंदर २१ राज्यांमधून ६३८ लाख टनाहून अधिक धान्याची खरेदी करण्यात आली आहे. सरकारनं आपल्या मध्यवर्ती संस्थांमार्फत तीन लाख, ९ हजार टन मूग, उडीद, भुईमूग आणि सोयाबीनची खरेदी केली. यामुळे एक लाख ६७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या काळात डाळींच्या शंभराहून अधिक सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या प्रजाती विकसित झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. जागतिक डाळ दिवसानिमित्त रोम इथं आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे ते बोलत होते. गेल्या पाच ते सहा वर्षांत भारतानं डाळीचं उत्पादन १४० लाख टनांवरून २४० लाख टनांपर्यंत वाढवलं असल्याचं तोमर यांनी यावेळी सांगितलं.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

भारत -इंग्लंड दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या आपल्या पहिल्या डावात ५ बाद ७६ धावा झाल्या आहेत. आज भारतानं ६ बाद ३०० धावांवरुन पुढे खेळ सुरू केला. मात्र अवघ्या २९ धावांची भर घालत भारताचा सर्व संघ तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या इग्लंडच्या संघाचीही सुरूवात निराशाजनक झाली. पाच फलंदाज बाद झाले असून दोन फलंदाज रविचंद्रन अश्विननं तर अक्षर पटेल आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एका फलंदाजास बाद केले. चार सामन्यांच्या या मालिकेत इग्लंड एक शुन्यनं आघाडीवर असून जागतिक कसोटी क्रमवारी तालिकेत अव्वल स्थानावर आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

राज्यभरात सध्या हवामान कोरडं असलं तरी पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा येण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रालगत चक्रीय वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी विदर्भासह मराठवाड्यात येऊ घातलेला हा अवकाळी पाऊस त्यानंतर बुधवारी पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी हजेरी लावण्याची शक्यता आहे. येत्या १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान कोकण वगळता मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात तापमानातही अपेक्षित वाढ सुरू झाली असून आगमी ३६ तासांत दोन अंशांची तापमान वाढ अपेक्षित आहे.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या येळेगाव इथं भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यची २७ वी वार्षिक सभा काल झाली. या सभेला संबोधित करतांना जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यातील साखर उद्योग अडचणीत सापडला असल्याची टीका केली.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$****

नांदेड इथल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यासमोर काल शिव जयंती उत्सव मिरवणुकांसंदर्भात राज्य शासनानं घातलेल्या विविध अटी मागे घेण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आलं.

$758308E6-2202-4518-8A5B-75F97ED69346$***///***

 

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 19.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 19 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...