आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ फेब्रुवारी २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
आज
साजऱ्या होत असलेल्या वसंत पंचमीनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना
शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण जनतेच्या आयुष्यात सुख, समृद्धि आणि आनंद घेऊन येवो अशी
कामना राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये केली आहे. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू,
गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
यांनीही वसंत पंचमीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
****
केंद्रीय
विद्यालयाच्या देशभरात असलेल्या शाळा सुरू झाल्या आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर
या सर्व शाळांना राज्य सरकारं आणि केंद्रीय गृह मंत्रालयानं दिलेल्या दिशा निर्देशानुसार
नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. पहिली ते आठवी या इयत्तेच्या शाळाही
सुरू करण्यात आल्या असून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा गेल्या ऑक्टोबरमध्येच टप्याटप्यानं
सुरू करण्यात आल्या आहेत.
****
तृणमूल
कॉंग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचा राजीनामा राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती
एम. वेंकैया नायडू यांनी स्वीकारला आहे. गेल्या १२ तारखेला त्रिवेदी यांनी राज्यसभेत
अर्थसंकल्पावरच्या चर्चेच्या वेळी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पश्चिम बंगालमध्ये
होत असलेल्या हिंसक घटना पाहून आपल्याला दु:ख होत असल्याचं त्रिवेदी यांनी नमूद केलं
होतं.
****
राष्ट्रीय
महामार्गांवर वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना काल मध्यरात्रीपासून फास्ट टॅग प्रणाली
लागू करण्यात आली. आता सर्व वाहनांना या प्रणालीच्या माध्यमातून पथकर भरणं बंधनकारक
करण्यात आलं आहे. फास्ट टॅग नसणाऱ्या किंवा वैध फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनांना त्यांच्या
श्रेणीत विहीत असलेल्या पथकरापेक्षा दुप्पट पथकर भरावा लागेल. पथकर भरतानाच्या वेळेत
बचत व्हावी, पथकर नाक्यांवरची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, डिजिटल पद्धतीनं पथकर भरला
जावा, या हेतुनं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं वाहनांवर फास्ट टॅग लावणं बंधनकारक
केलं आहे.
****
पंढरपूर
इथल्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल आणि रूक्मिणीमातेच्या विवाह
सोहळ्या निमित्त गाभाऱ्यात तसंच सभामंडप, नामदेव पायरी आणि मंदिरात सुंदर आणि आकर्षक
अशी रंगबेरंगी फुलाची आरास करण्यात आली आहे. आज विठ्ठल रुक्मिनीच्या विवाह सोहळ्या
निमित्तानं अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
चेन्नई
इथं सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी शेवटचं वृत्त
हाती तेव्हा इंग्लडच्या चार बाद ९० धावा झाल्या होत्या. कर्णधार जो रूट २२ तर बेन स्टोक्स
आठ धावांवर खेळत होते. रविचंद्रन अश्विननं डॅनियल लॉरेन्स सकाळी लवकर बाद केलं. विजयासाठी
इंग्लंडला ३९२ धावांची तर भारताला अजून सहा बळींची आवश्यकता आहे.
****
No comments:
Post a Comment