Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 January 2022
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ जानेवारी २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशात
कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४८ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ९१
लाख २५ हजार ९९ नागरीकांना लस देण्यात आली. देशात आतापर्यंत या लसीच्या १४८ कोटी ६७
लाख ८० हजार २२७ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,
लसीकरण मोहीमेत १५ ते १८ वर्षाच्या मुलांना आतापर्यंत लसीच्या एक कोटी २४ लाख मात्रा
देण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीया यांनी आपल्या ट्विटर संदेशाद्वारे,
किशोरवयीन मुलांमध्ये लसीकरणाबाबत असलेल्या उत्साहाचं कौतुक केलं आहे, तसंच या लसीकरणाचा
एवढा टप्पा गाठल्याबद्दल मुलांचं अभिनंदन देखील केलं आहे.
****
केंद्रीय
आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्या गृहविलगीकरणात
आहेत. आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी ट्विटर
संदेशाद्वारे केलं आहे.
नाशिकचे
खासदार हेमंत गोडसे यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
****
नागरी
सेवा मुख्य परीक्षा २०२१ निर्धारित वेळापत्रकानुसार घ्यायचा निर्णय केंद्रीय लोकसेवा
आयोगानं घेतला आहे. कोविड १९ बाबत सध्या निर्माण झालेल्या स्थितीचा काळजीपूर्वक आढावा
घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
राज्य सरकारांनी घातलेले निर्बंध आणि नियमांमुळे अडचणी न येता परीक्षार्थींना परीक्षेसाठी
सहज जाता-येता यावं याची काळजी राज्यं सरकारांनी घ्यावी अशी विनंती आयोगानं केली आहे.
त्यादृष्टीनं या परीक्षेच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध असेल,
याची निश्चिती करावी अशी विनंतीही आयोगानं केली आहे.
****
आद्य
पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज मराठी पत्रकार दिन म्हणून साजरी
करण्यात येत आहे. जांभेकर यांनी बाणेदार आणि निर्भीड पत्रकारितेचं बाळकडू दिलं असून,
आजच्या आव्हानात्मक परिस्थितीत हा वसा आणि वारसा जतनाचं सामर्थ्य मराठी पत्रकारितेत
निश्चितच आहे, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना विनम्र अभिवादन करत, मराठी पत्रकार दिनानिमित्त सर्व
पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं येत्या मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात
येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परिक्षेसाठी, खासगीरित्या अर्ज क्रमांक १७ भरुन
परिक्षा देण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची सुविधा मंडळानं खुली केली आहे. यासाठी अतिविलंब
शुल्कासह ऑनलाईन पध्दतीनं नावनोंदणीसाठी, येत्या १२ जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकारले
जातील, असं मंडळानं काल जारी केलेल्या पत्रकांत म्हटलं आहे.
दरम्यान,
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी
घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा रद्द झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांकडून
भरण्यात आलेलं परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय मंडळानं घेतला असल्याचं, काल जारी
करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
नाशिक
जिल्ह्यात मुंबई - आग्रा महामार्गावर इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगाव जवळ एक कंटेनर
मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या कारवर जाऊन धडकला. या अपघातात नाशिक जिल्हा परिषदेच्या
पाच शिक्षकांचा मृत्यू झाला, तर दोन शिक्षिका गंभीररित्या जखमी झाल्या. काल दुपारी
हा अपघात झाला. जखमींवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद
इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे पुरस्कार काल जाहीर झाले. यंदाचा
डॉ. रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार, लातूर इथल्या संवेदना केंद्राच्या संस्थापक संचालक
दीपा सुरेश पाटील यांना, तर डॉ भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार, पुण्याच्या चैतन्य महिला
मंडळाच्या संस्थापक संचालक ज्योती पठानिया यांना जाहीर झाला आहे. २१ हजार रुपये, मानवस्त्र,
सन्मान पत्र, आणि सन्मान चिन्ह, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सावित्रीबाई फुले यांच्या
जयंतीनिमित्त दिले जाणारे हे पुरस्कार, येत्या शनिवारी आठ जानेवारीला प्रदान केले जातील.
औरंगाबाद इथं हेडगेवार रुग्णालयातल्या दामु अण्णा दाते सभागृहात सायंकाळी पाच वाजता
हा कार्यक्रम होणार आहे. पुरस्कारांचं हे चौथं वर्ष आहे.
****
मराठवाड्यात
येत्या नऊ ते १५ जानेवारीपर्यंत कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परभणीच्या वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला आहे. औरंगाबाद
आणि जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी येत्या शनिवारी आठ तारखेला हलक्या पावसाचा इशाराही
देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment