Friday, 7 January 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 07.01.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०७ जानेवारी २०२ सकाळी ११.०० वाजता

****

जम्मू काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात जोलवा क्रालपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी जैश - ए - मोहम्मद या संघटनेचे असल्याचं पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं. चकमकीच्या ठिकाणाहून तीन ए के ५६ रायफल्स जप्त करण्यात आल्या. 

****

ग्रीन एनर्जी कॉरिडॉर या आंतरराज्य पारेषण व्यवस्थेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीनं मंजुरी दिली आहे. नवी दिल्ली इथं मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. या योजनेमुळे अंदाजे १० हजार ७५० सर्किट किलोमीटर पारेषण वाहिन्यांची भर पडणार असून, सुमारे उपकेंद्रांची पारेषण क्षमता २७ हजार ५०० मेगाव्होल्ट अॅम्पीअर्सनं वाढणार आहे.

****

कोविड व्यवस्थापनासाठी सर्व राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जिल्हास्तरीय आणि उपजिल्हास्तरीय नियंत्रण केंद्रे स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. या केंद्रांमध्ये पुरेसे डॉक्टर्स तसंच इतर पायाभूत सुविधा परिपूर्ण असाव्यात आणि केंद्रातील अधिकाऱ्यांनी रुग्णांना पुरेशा खाटा उपलब्ध होण्यासाठी देखरेख करावी, केंद्रांमध्ये आसपासची कोरोना चाचणी केंद्र तसंच रुग्णवाहिका उपलब्धतेविषयी अद्ययावत माहिती असावी, अशा सूचना देणारं पत्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य तसच प्रधान सचिवांना लिहिलं आहे.

****

दिल्ली पोलिसांच्या पथकानं ‘बुली बाई’ ॲप तयार करणाऱ्या मुख्य आरोपीला आसाम येथून अटक केली आहे. आरोपी २१ वर्षीय नीरज बिष्णोई हा ‘गिथहब’ वरून अॅप बनवणारा मुख्य आरोपी आहे. दिल्ली महिला आयोगानं ‘बुली बाई’ आणि ‘सुली डील’ अॅपवरच्या आक्षेपार्ह सामग्रीच्या चौकशीच्या संदर्भात या आठवड्याच्या अखेरीस दिल्ली पोलिसांना हजर राहण्यास सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनीही या प्रकरणी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात काल १२८ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात शहरातल्या १११, तर ग्रामीण भागातल्या १७ रुग्णांचा समावेश आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 06.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...