Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 21 November 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१
नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - इपीएफओनं यंदा
सप्टेंबर महिन्यामध्ये सुमारे १७ कोटी सदस्य जोडले आहेत. यात
सुमारे नऊ कोटी ३४ लाख नवीन सदस्यांचा समावेश
आहे. इपीएफओनं जारी केलेल्या तात्पुरत्या वेतनश्रेणीच्या माहिती
मध्ये, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सप्टेंबर मध्ये निव्वळ
सदस्यत्वामध्ये नऊ पूर्णांक चार टक्क्यांची
वाढ झाल्याचं म्हटलं आहे. नवीन सदस्यांमध्ये १८ ते २१ वयोगटातल्या सर्वाधिक दोन कोटी
९४ लाख म्हणजे जवळपास ५९ टक्के सदस्यांची
नोंदणी झाली आहे. प्रथमच नोकरी शोधणारे त्यांचं शिक्षण संपवून मोठ्या संख्येनं संघटित
क्षेत्रातल्या कर्मचार्यांमध्ये सामील होत आहेत तसंच संघटित
क्षेत्रातलया नवीन नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर, देशातल्या तरुणांपर्यंत पोहोचत आहेत, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
भारतीय
प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून पदभार
स्वीकारला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती.
राजीव कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यावर्षी मे पासून
तिसऱ्या निवडणूक आयुक्तांचं पद रिक्त होतं.
****
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अर्थसंकल्प-पूर्व बैठकांची दूरस्थ पद्धतीनं सुरुवात
केली. यात उद्योग जगतातले नेते, पायाभूत सुविधा आणि हवामान बदलातील तज्ञ सहभागी झाले
आहेत. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पासाठी सूचना मागवण्याकरता या बैठका
होणार असल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
मुबंईत पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारकाचं लोकार्पण मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात भारताचं आर्थिक यश ठळकपणे उठून दिसणारं आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. काल
मुंबईत २१ व्या जागतिक लेखापाल महासभेला संबोधित करताना ते बोलत होते. जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे
विकासाला चालना देण्यासाठी तसंच जगाला मार्ग दाखवण्यासाठी’ म्हणून
मोठ्या आशेनं पाहत आहे, असं ते म्हणाले.
****
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी औरंगाबाद शहरात देण्यात
आलेल्या विविध जमिनींची, महानगरपालिकेचे प्रशासक डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी काल
पाहणी केली. हर्सूल, सुंदर वाडी, चिकलठाणा, तिसगाव
आणि पढेगाव इथल्या जमिनींची पाहणी करुन त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना
केल्या.
****
नांदेड इथल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दाखल असलेल्या
तक्रार अर्जामध्ये मदत करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दोन जणांना काल औरंगाबादच्या
लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं नांदेड इथं सापळा रचून अटक केली. तक्रारदाराच्या
भावाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात दहा हजार रुपये लाच मागणीसंदर्भात तक्रार
दाखल करण्यात आलेली होती. त्यावर
कारवाई टाळावी म्हणून खाजगी व्यक्ती
शकिल आजिमसाब आणि सय्यद ईस्माईल यांनी तक्रारदराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली
होती, तडजोडी अंती ६० हजार रुपये लाच घेतांना या दोघांना अटक करण्यात
आली.
****
मीरा भाईंदरमध्ये उभारण्यात येणार्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचं भूमीपूजन रिपब्लिकन पक्षाचे
राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या
हस्ते काल झालं. सर्व सुविधांनी सज्ज असं हे भवन भावी पिढीला प्रेरणा
देईल, असं आठवले यावेळी म्हणाले. सांस्कृतिक
भवनात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंगचं आणि
स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण देण्यात यावं, असं त्यांनी सांगितलं.
****
स्पेनच्या ला नुसिया इथं सुरु असलेल्या युवा पुरुष
आणि महिला जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत, आठ भारतीय खेळाडूंनी
उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उप-उपांत्यपूर्व फेरीत विश्वनाथ, वंशज, जादुमणी सिंग, आशिष,
दीपक, भावना शर्मा आणि तमन्ना या भारतीय खेळाडूंनी आपापल्या लढती जिंकून अंतिम आठ टप्प्यात
प्रवेश केला.
****
कतार
मध्ये सुरु असलेल्या फिफा - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज इंग्लंड विरुद्ध इराण आणि
अमेरिका विरुद्ध वेल्स हे सामने होणार आहेत. भारतीय वेळेनुसार अनुक्रमे संध्याकाळी
साडे सात आणि रात्री साडे बारा वाजता हे सामने होतील.
****
राज्यात
थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी हंगामातली निच्चांकी नोंद झाली आहे.
ग्रामीण भागात अति थंडीमुळे द्राक्ष पिकाला धोका निर्माण होऊ शकतो, असं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
//***********//
No comments:
Post a Comment