आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२२
जूलै २०२४ सकाळी
११.०० वाजता
****
संसदेचं
अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. हे अधिवेशन सकारात्मक आणि सृजनात्मक व्हावं, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
ते आज अधिवेशनाला प्रारंभ होण्यापूर्वी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. स्वातंत्र्याच्या
अमृतकाळातला हा अर्थसंकल्प, देशाच्या
पुढच्या पाच वर्षांचं चित्र स्पष्ट करणारा असेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
****
दरम्यान, या अधिवेशनात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२३-२४
चा आर्थिक पाहणी अहवाल सदनासमोर सादर करतील. तर उद्या २०२४-२५ वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प
सादर करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
नेतृत्वाखालच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल.
****
केरळमध्ये
निपाह विषाणूमुळे एकाचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारनं केरळ राज्य सरकारला या आजारावर
नियंत्रण ठेवण्यासाठी तत्काळ सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत, यासाठी तज्ज्ञांचं एक संयुक्त पथक तैनात करण्यात आलं आहे.
****
उत्तराखंडात
केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या पायी मार्गावर दरड कोसळल्यामुळे ३ भाविकांचा मृत्यू झाला
यामध्ये जालना जिल्ह्यातल्या गोंदी इथले सुनील महादेव काळे तसंच नागपूरचे किशोर पराटे
या युवकांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातले आणखी नऊ भाविक दुर्घटनाग्रस्त ठिकाणी असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती
जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
****
मुंबई
शहरासह उपनगरात आजही पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबलं असून, मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.
छत्रपती
संभाजीनगर शहर आणि परिसरातही आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
****
No comments:
Post a Comment