Monday, 24 April 2017

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 April 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      देशाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा आराखडा नीति आयोगाच्या बैठकीत सादर

·      मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विविध योजना राबवण्यासाठी विशेष निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारकडे मागणी

·      शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी २२ शेती उत्पादनांना किमान हमी भाव मिळवून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन - महसूल मंत्री

·      मराठवाडा साहित्य परीषदेचा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते, शरद पवार यांना तर, नटवर्य लोटुभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना प्रदान

आणि

·      विविध सात ठराव मंजूर करत उस्मानाबाद इथल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा समारोप

*****

देशाचा नियोजनबद्ध आणि वेगानं विकास घडवून आणण्यासाठी १५ वर्षांचा आराखडा काल नीति आयोगाच्या बैठकीत सादर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांसह तेरा राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. देशातली सर्व राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था तसंच अशासकीय संस्थांनी आगामी २०२२ साठीची उद्दीष्ट निर्धारित करून, ती साध्य करण्यासाठी काम सुरू करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. नवी दिल्ली इथं नीति आयोगाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. भ्रष्टाचाराला आळा घालून खरेदी व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्यांनी सरकारच्या ई मार्केटप्लेस सुविधेचा वापर करावा, असंही पंतप्रधान म्हणाले. र्वांच्या एकत्रित प्रयत्नातूनच नव्या भारताच स्वप्न साकार होईल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्यांनी भांडवल खर्च आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीची गती वाढवावी, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

दरम्यान, या बैठकीत बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळी तसंच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विविध योजना राबवण्यासाठी केंद्र शासनानं विशेष निधी द्यावा अशी मागणी केली. यासंदर्भात राज्य सरकारनं केंद्राकडे सविस्तर प्रस्ताव पाठवला असल्याचं ते म्हणाले. डिजीटल व्यवहार, सूक्ष्म सिंचन पद्धतीनं उसाची शेती करणं, यासाठी राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्यांना केंद्राकडून मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्याचप्रमाणं डाळींचं उत्पादन वाढविण्यासाठी सुरक्षित साठा, अतिरिक्त साठा निर्माण करणे आणि आयात योजना तयार करणे आदि दीर्घकालिन योजना आखाव्यात, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.

****

सरकारनं यावर्षीपासून पीक पेरणी क्षेत्राचा ४० टक्के भाग पीक विमा योजनेच्या कक्षेत आणण्याचं उद्दीष्ट निर्धारित केलं आहे. कृषी मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआयला ही माहिती दिली. पंतप्रधान पीक विमा योजनेला पहिल्या वर्षात चांगला प्रतिसाद मिळाला असून, २०१७ - १८ या आर्थिक वर्षात सात कोटी ७६ लाख हेक्टर क्षेत्र या योजनेअंतर्गत आणणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  

****

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ऊस, सोयाबीन, कापूस यासह २२ शेती उत्पादनांना किमान हमी भाव मिळवून देणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन असून यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी दिली. कोल्हापूर इथं ते काल वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून यासंदर्भात अनुकूल निकाल लागावा यादृष्टीने शासन विविध स्तरावर प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत येत्या आठ दिवसात सकल मराठा समाज समिती आणि मुख्यमंत्री यांची चर्चा होणार असल्याचंही पाटील यावेळी म्हणाले.  

****

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकोणतीसाव्या सावरकर साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते काल ठाण्यात बोलत होते. केंद्रात आपलेच सरकार असताना सावरकरांना भारतरत्न सन्मान जाहीर करण्यासाठी कुणाच्या परवानगीची वाट पाहताय, असा सवाल ठाकरे यांनी यावेळी बोलतांना उपस्थित केला. सावरकरांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावेळी केलं.

****

मराठवाडा साहित्य परिषद -मसाप तर्फे देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार यांना तर, नटवर्य लोटुभाऊ पाटील नाट्य पुरस्कार ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना  प्रदान करण्यात आला. काल, औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परीषदेच्या सभागृहात या पुरस्कारांचं समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. पवार यांना त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्रपर पुस्तकासाठी तर रंगभूमीवरील योगदानासाठी पटेल यांना पुरस्कार मिळाला. याप्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करतांना पवार यांनी मराठी भाषेची प्रांतवार वैविध्यता असून संतांची  भूमी असलेल्या मराठवाड्यात प्रेमाचा ओलावा जाणवतो असं नमूद केलं. आपल्या राजकीय कारकीर्दीसह सांस्कृतिक-सार्वजनिक जीवनाची पन्नास वर्षे पूर्ण करतांना मिळालेल्या यशात प्रेम करणाऱ्या लोकांचं मोठं योगदान असून  बालपणी आईनं केलेल्या संस्कारांमुळेच हा पल्ला गाठता आला असं पवार म्हणाले. यावेळी बोलतांना जब्बार पटेल यांनी आपण रंगभूमीवर लवकरच जुन्या आणि नविन नाटकांसह पदार्पण करत असून त्याला युवावर्गाचाही प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त केली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

उस्मानाबाद इथं आयोजित सत्याण्णवाव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा काल समारोप झाला. या समारोप सत्रात विविध सात ठराव मांडण्यात आले. दिवंगत कलावंतांना श्रद्धांजली, रंगभूमीशी निगडीत रंगकर्मींच्या सन्मानार्थ अभिनंदन प्रस्ताव त्याचप्रमाणे, वृद्ध कलावंत मानधन, समितीवर स्थानिक शाखेचा प्रतिनिधी घेणे, राज्यातल्या नाट्यगृह समितीवर नाट्य परिषदेचा प्रतिनिधी घ्यावा, ललित कला आणि नाट्य शास्त्र विभागाच्या संस्थांना अनुदान मिळावं आदी ठराव यावेळी सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

काल शेवटच्या दिवशी अधिवेशनात विविध कार्यक्रमांसह नाट्यकृतींच्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातले प्राध्यापक रावसाहेब देशमुख यांनी, १९५७ ते १९८२ या काळात गाजलेल्या २९ नाटकांची संपूर्ण माहिती मिळवून, हे प्रदर्शन भरवलं होतं. ऐतिहासिक, दुर्मिळ नाट्य ठेवा नवीन पिढीकडे संक्रमित व्हावा या उद्देशानं हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं.

****

औरंगाबाद शहरात दहा ठिकाणी संत सावता माळी आठवडी बाजार भरवणार असल्याचं, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं प्रायोगित तत्वावर भरवण्यात आलेल्या संत सावता माळी आठवडी बाजाराचं उद्घाटन भापकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्याच्या मालाचं दर्जेदार विपणन झालं पाहिजे, असं मत भापकर यांनी व्यक्त केलं.

****

परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यात राजुरा इथं एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान, ३० जणांना अन्नातून विषबाधा झाली. या सर्वांवर मानवत तसंच परभणी इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. कडक उन्हाळा आणि अस्वच्छता यामुळे हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

****

नागपूर-मुंबई महामार्गाला शेतकरी विरोध करत असून, राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्या नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी विरोधी पक्षात असतांना मागणी करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते, सत्तेत आल्यानंतर आता या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सुळे यांनी नमूद केलं.

****

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ५२

प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी तब्बल ५२ तास स्वयंपाक करण्याचा विश्व विक्रम रचला असून या काळात त्यांनी एक हजारहून अधिक शाकाहारी पदार्थ बनवले. यामुळे अमेरिकन शेफ बेंजामिन पेरी यांचा ४० तास स्वयंपाक करण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. काल सायंकाळी त्यांनी हा विश्वविक्रम पूर्ण केला. शुक्रवारी सकाळी त्यांनी उपक्रमाला सुरुवात केली होती.
****
तूर खरेदीबाबात केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांच्यासोबत आज बैठक होणार असल्याचं पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काल मुंबईत सांगितलं. मुदत संपल्यामुळे शनिवारी मध्यरात्रीपासून राज्यातली तूर खरेदी बंद झाली. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे, यापार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांसोबत चर्चा केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
तास स्वयंपाक करण्याचा विश्व विक्रम रचला असून या काळात त्यांनी एक हजारहून अधिक शाकाहारी पदार्थ बनवले. यामुळे अमेरिकन शेफ बेंजामिन पेरी यांचा ४० तास स्वयंपाक करण्याचा विक्रम त्यांनी मोडला आहे. काल सायंकाळी त्यांनी हा विश्वविक्रम पूर्ण केला. शुक्रवारी सकाळी त्यांनी उपक्रमाला सुरुवात केली होती.

No comments: