आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.००
वाजता
****
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज राज्यभरात उत्साहात साजरी होत आहे.
यानिमित्त ठिकठिकाणी विविध सामाजिक तसंच अन्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा
दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि त्यांचं साहसिक कार्य प्रत्येक भारतीयाला
प्रेरणा देत राहील, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. सत्य आणि न्यायाचं
प्रतिकं असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श शासनकर्ता आणि खरे राष्ट्रप्रेमी असल्याचं
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथं शिव
जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये
शिवजंयतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आज सकाळी मिरवणूक काढण्यात आली. विद्यापीठाच्या
नाट्यगृहात काल संध्याकाळी संत तुकाराम संगीत नाटकाचा प्रयोग झाला.
****
गुरू रविदास यांची
जयंती आज देशभरात साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. संत रविदास यांच्या शांति, सद्भाव
आणि बंधुभावाच्या संदेशाचं पालन करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. सौहार्द, समानता
आणि सामाजिक सशक्तिकरणाविषयी संत रविदास यांचा संदेश शाश्वत आणि अमूल्य असून, लोकांना
प्रेरणा देणारा असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वराणसी इथं त्यांनी डिझेल लोकोमोटीव कारख्यान्यात
डीझेलमधून परावर्तित केलेल्या पहिल्या विद्युत रेल्वे इंजीनाला हिरवा झेंडा दाखवून
रवाना केलं. गुरु रविदास यांचं जन्मस्थळ असलेल्या वाराणसी मधल्या शीर गोवर्धनपूर इथं
भेट देऊन पंतप्रधानांनी, त्यांना अभिवादन केलं. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये मदन मोहन
मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाटन, लहरतारा इथंही होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन
आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बनारस हिंदू विद्यापीठामध्ये जन आरोग्य योजना
-आयुष्मानच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधतील.
*****
***
No comments:
Post a Comment