Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 March 2019
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ मार्च २०१९ दुपारी १.०० वा.
****
मतदान पडताळणी पावती यंत्र व्ही व्ही पॅटच्या नमूना
सर्वेक्षणाची संख्या वाढवता येईल का, याबाबत निवडणूक आयोगानं येत्या २८
तारखेपर्यंत उत्तर द्यावं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. या संदर्भात दाखल
एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान, आज न्यायालयाने हे निर्देश दिले. सध्या एका मतदार
संघातून एकाच व्ही व्ही पॅटच्या पावत्या पडताळून पाहिल्या जातात. या प्रकरणी पुढची
सुनावणी पुढच्या सोमवारी होणार आहे.
निवडणुकीच्या काळात रोड शोज तसंच वाहन फेऱ्यांवर
प्रतिबंधाची मागणी करणारी एक याचिका मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळून लावली.
उत्तर प्रदेशातल्या निवृत्त पोलिस महासंचालकांनी, ही याचिका दाखल केली होती, वाहन फेऱ्या
आणि रोड शोज मुळे पर्यावरणाला धोका संभवतो, म्हणून, निवडणूक आयोगाला, अशा आयोजनांवर
प्रतिबंधाचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत केली होती.
****
तिहेरी तलाक प्रतिबंधक अध्यादेशाच्या घटनात्मक वैधतेला
आव्हान देणारी एक याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं, फेटाळून लावली आहे. या अध्यादेशानुसार
तिहेरी तलाक हा दंडनीय अपराध ठरतो. असा कायदा करणं, हा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप
ठरत नाही, असं सांगत, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं, ही
याचिका फेटाळून लावली. गेल्या वर्षभरापेक्षाही कमी काळात, हा अध्यादेश तीन वेळा जारी
करण्यात आल्याचं, या याचिकेत म्हटलं होतं.
****
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काल झालेल्या
मतदानाची आज मोजणी झाली. बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी कॅाग्रेस आणि राष्ट्रवादी
कॉग्रेस आघाडीच्या पूनम पाटोळे विजयी झाल्या. नगर परिषदेत काँग्रेसचे अकरा तर शिवसेनेचे
सात उमेदवार निवडून आले.
सिंदखेड राजा नगर
परिषदेवर मात्र शिवसेनेचा उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. मात्र या नगर परिषदेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
आघाडीचे सर्वाधिक नऊ तर शिवसेना भाजप
युतीचे आठ सदस्य निवडून आले.
****
पहिल्या
टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
नागपूर लोकसभा
मतदार संघातून भाजपचे उमेदवार नीतीन गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या पहिल्या टप्प्यात नागपूरसह वर्धा, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,
चंद्रपूर आणि यवतमाळ - वाशिम या सात लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सर्वच
ठिकाणी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.
****
बीड जिल्ह्यात सरकारी यंत्रणा, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या दबावाखाली
काम करत असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.
ते आज बीड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे
यांना आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एका सभेला दिलेली परवानगी अचानक नाकारण्यात आली, या विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षक
आणी जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं, धनंजय मुंडे यांनी
सांगितलं. या संबधी बीड लोकसभा निवडणुकीचे निरीक्षकांकडे सर्व पुरावे देणार असल्याचं,
त्यांनी सांगितलं. ही सभा तुर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेस प्रकाश
सोंळके, अमरसिंह पंडित, संदिप क्षीरसागर उपस्थित असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
औरंगाबाद इथले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी,
आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. काँग्रेस पक्षानं
औरंगाबाद तसंच जालना मतदार संघातून अनुक्रमे सुभाष झांबड आणि विलास औताडे यांना उमेदवारी
जाहीर केल्यानंतर सत्तार नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष
पदाचा राजीनामा देऊन, काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याच्या वृत्तानंतर, ते
भाजपात जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र सत्तार यांनी, आज पत्रकार परिषद घेऊन, या चर्चेला
विराम दिला. येत्या २९ तारखेला पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन, त्यांच्याशी चर्चा
केल्यानंतरच पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं, सत्तार यांनी सांगितलं.
****
नाशिक जिल्ह्याच्या लासलगाव बाजार समितीत पुढचे दहा
दिवस कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष अखेर निमित्त हिशेब आणि ताळेबंदच्या
कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment