आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ ऑक्टोबर २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
बँक कर्मचाऱ्यांचा
आज देशव्यापी संप आहे. विलीनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात
आला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा विरोध असून, डाव्या संघटनांनी मात्र पाठिंबा
दर्शवला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातले ५००, मराठवाड्यातले २००० तर राज्यभरातले जवळपास
३० हजार बँक कर्मचारी या संपात सहभागी आहेत. मात्र स्टेट बँक़ ऑफ इंडिया आणि इंडियन
ओवरसीज बँक या बँकांचा या संपात सहभाग नाही.
***
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसोबतच, १७ राज्यांतल्या ५१ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी तसंच बिहार मधल्या
समस्तीपूर आणि महाराष्ट्रातल्या सातारा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. या सर्व जागांसाठीची मतमोजणीही परवा २४
ऑक्टोबरला होणार आहे.
****
औरंगाबाद इथल्या पी ई एस शिक्षण संस्थेच्या
बी पी एड महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बाबुराव गंगावणे यांचं आज पहाटे ४ वाजता हृदयविकाराच्या
धक्क्यानं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. औरंगाबाद ॲथेलेटिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून
त्यांनी काम पाहिलं होतं. औरंगाबाद इथं छावणी स्मशानभूमीत आज दुपारी ४ वाजता त्यांच्या
पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
***
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत
भारतानं एक डाव आणि दोनशे दोन धावांनी विजय मिळवत, कसोटी मालिका तीन शून्य अशी जिंकली
आहे. दक्षिण आफ्रिका संघानं आज सकाळी कालच्या आठ बाद १३२ धावांवरून पुढे खेळण्यास
सुरुवात केली, पण अवघ्या एका धावेत त्यांचे अखेरचे दोन फलंदाज बाद झाले. रोहित शर्माने
सामनावीर तसंच मालिकावर पुरस्कार पटकावला.
****
No comments:
Post a Comment