Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24
October 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ सायंकाळी ६.००
****
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना
महायुतीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी १०३
जागांवर भाजप तर ५८ जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. काँग्रेस ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेस
५३ जागांवर आघाडीवर आहेत. वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एमआयएम
ला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. अपक्ष २८ जागांवर आघाडीवर आहेत. अपक्षांमध्ये बहुतांश
उमेदवार हे भाजप किंवा शिवसेनेचे बंडखोर आहेत. एमआयएमचा उमेदवार नाशिक जिल्ह्यातल्या
मालेगाव मतदारसंघातून निवडून आला आहे.
****
विजयी झालेल्या उमेदवारामध्ये
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब
थोरात, प्रणिती शिंदे, सुरेश वरपुडकर, विश्वजित कदम, के.सी.पडवी,
रणजित कांबळे, प्रणिती शिंदे
यांचा समावेश आहे.
शिवसेनेचे आदित्य ठाकरे,
बुलडाण्यातून संजय गायकवाड, प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे आणि दादा भुसे, डॉ.राहुल पाटील विजयी झाले आहेत.
भाजपचे
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गणेश नाईक,
बबनराव लोणीकर, विजयकुमार गावित,
डॉ.अशोक उईके, संभाजी पाटील
निलंगेकर विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,
अजित पवार, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, नवाब मलिक,
सुमन पाटील, अनिल देशमुख, धारावीतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, माजलगाव इथून राष्ट्रवादी
काँग्रेसचे प्रकाश सोळंके विजयी झाले आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
नऊ मतदार संघापैकी सहा जागांवर शिवसेना तर तीन जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सिल्लोड मतदार संघात शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी एक लाख चौदा हजार ७३१ मते घेवून
अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २५ हजार २२१ मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचे
उदयसिंग राजपूत यांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचा अठरा हजार ६०० मतांनी पराभव
केला आहे. औरंगाबाद पूर्व मतदार संघात भाजपचे अतुल सावे, औरंगाबाद मध्य मतदार संघात
प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे संजय शिरसाट, गंगापूर मतदार
संघात भाजपचे प्रशांत बंब आणि वैजापूर मतदार संघात शिवसेनेचे विजय बोरणारे, पैठण मतदारसंघात
शिवसेनेचे संदीपान भुमरे विजयी झाले असून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे
डॉ राहुल पाटील, गंगाखेड मधून रासपचे रत्नाकर गुट्टे, पाथरीतून कॉंग्रेसचे सुरेश वरपुडकर
हे विजयी झाले आहेत. तर जिंतूर मतदार संघात भाजपच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत.
बीड जिल्ह्यात परळी मतदार
संघात राष्ट्रवादी काँग्रसेचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा
तीस हजार ४६८ मतांनी पराभव केला आहे. बीड मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
संदिप क्षीरसागर विजयी झाले आहेत. गेवराई मतदार संघात भाजपचे उमेदवार लक्ष्मण पवार
यांनी विजयसिंह पंडित यांचा सहा हजार सातशे ९१ मतांनी पराभव केला. केज मतदार संघात
भाजपच्या नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला
आहे. आष्टी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे १९ हजार ३०० मतांनी
आघाडीवर आहेत.
जालना मतदारसंघात काँग्रेसचे
कैलास गोरंट्याल २६ हजार ३७ मतांनी आघाडीवर आहेत. शिवसेनेचे उमेदवार अर्जून खोतकर पिछाडीवर
आहेत. भोकरदन मतदार संघात मतमोजणी पूर्ण झाली असून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे
३२ हजार ३९० मातांनी आघाडीवर असून त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली नाही. परतूर
मतदार संघात बबनराव लोणीकर यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश जेथिलिया यांचा २५ हजार
९४२ मतांनी परभव केला आहे. घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे
दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत.
नांदेड जिल्ह्यात नऊ
पैकी चार जागा काँग्रेस पक्षानं जिंकल्या असून भाजपनं ३ जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना
आणि शेतकरी कामगार पक्षाने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या
कळमनुरी मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार संतोष बाबर विजयी झाले आहेत. त्यांनी वंचित
बहुजन आघाडीचे अजित मगर यांचा १६ हजार मतांनी पराभव केला.
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या
चार विधानसभा मतदार संघात महायुती विजयी झाली आहे. जिल्ह्यातल्या चार पैकी तीन ठिकाणी
शिवसेना तर एका जागेवर भाजपन जिल्ह्यात खाते उघडले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात
राणा जगजितसिंह पाटील, भूम परंडा मतदारसंघात तानाजीराव सावंत, उमरगा मतदारसंघात शिवसेनेचे
ज्ञानराज चौगुले तर उस्मानाबादेत शिवसेनेचे कैलास पाटील विजयी झाले.
****
भाजप शिवसेना महायुतीला
जनतेनं स्पष्ट कौल दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महायुतीला
बंडखोरीचा फटका बसला, विरोधी पक्षाच्या जागा वाढल्या असल्या तरी प्रबळ विरोधी पक्ष
होईल, इतक्या जागा वाढल्या नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
हा जनादेश सर्वच राजकीय
पक्षांचे डोळे उघडणारा असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होईल, याबाबत लवकरच
निर्णय होईल, असं ठाकरे यांनी सांगितलं.
*****
***
No comments:
Post a Comment